• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • दैवी देणगी! दुर्घटनेत हिरावल्या जुळ्या मुली, दोन वर्षांनी पुन्हा जन्मल्या पोटी

दैवी देणगी! दुर्घटनेत हिरावल्या जुळ्या मुली, दोन वर्षांनी पुन्हा जन्मल्या पोटी

गोदावरी नदीत बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत आपल्या जुळ्या मुली गमावलेल्या कुटुंबाला बरोबर दोन वर्षांनी (Twins born to a family who lost twins 2 years back) पुन्हा जुळ्या मुली झाल्या आहेत.

 • Share this:
  विशाखापट्टणम, 19 सप्टेंबर : काही घटनांचे योगायोग अशा पद्धतीने जुळून येतात की ती अनेकांना (God gift) दैवी देणगी आहे, असं वाटतं. गोदावरी नदीत बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत आपल्या जुळ्या मुली गमावलेल्या कुटुंबाला बरोबर दोन वर्षांनी (Twins born to a family who lost twins 2 years back) पुन्हा जुळ्या मुली झाल्या आहेत. जुळ्या मुली गमावल्याचं दुःख उरात घेऊन जगणाऱ्या एका जोडप्याला हा दैवी संकेत वाटत असून आपल्या मुली परत आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी घडली दुर्घटना 15 सप्टेंबर 2019 या दिवशी गोदावरी नदीत मोठा अपघात झाला होता. बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत विशाखापट्टणच्या भाग्यलक्ष्मी, त्यांचा पती, सासू आणि जुळ्या मुली प्रवास करत होते. अचानक ही बोट उलटली आणि अपघात झाला. या अपघातात जुळ्या मुली आणि सासू या तिघींचा मृत्यू झाला. त्यानंतर भाग्यलक्ष्मी आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं आभाळच कोसळलं होतं. कुटुंबातील तीन व्यक्ती गमावल्याचं डोंगराएवढं दुःख होतं. त्यातच जुळ्या मुली गेल्यामुळे लागलेली चुटपूट अस्वस्थता कमी होऊ देत नव्हती. हे वाचा -अफगाणिस्तानात अन्नाची टंचाई, पोटासाठी 1 लाखाची वस्तू विकली जातेय 25 हजारात नवे आयुष्य या दुःखात काही महिने गेल्यानंतर दोघांनीही पुन्हा आयुष्याची नवी सुरुवात करायचं ठरवलं. त्यासाठी पुन्हा एकदा बाळाला जन्म द्यायचं त्यांनी नक्की केलं. मात्र अनेक दिवस त्यांना मूल होत नव्हतं. मग त्यांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यातून भाग्यलक्ष्मी यांना गर्भधारणा झाली. त्यांच्या पोटी पुन्हा जुळ्या मुली जन्माला आल्या आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी दुर्घटना घडली होती, त्याच दिवशी जुळ्या मुलींचा जन्म झाला. 15 सप्टेंबर 2019 ला गोदावरी नदीत दुर्घटना घडली होती, तर 15 सप्टेंबर 2021 ला जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यामुळे ही आपल्या आय़ुष्यात मिळालेली दैवी देणगी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
  Published by:desk news
  First published: