मुंबईत न्यायालयाच्या आदेशावरून खुन्यावर 20 वर्षं उपचार; नंतर सुनावली जन्मठेपेची शिक्षा

खून्यावर 20 वर्षे उपचार केल्यानंतर न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 11:42 AM IST

मुंबईत न्यायालयाच्या आदेशावरून खुन्यावर 20 वर्षं उपचार; नंतर सुनावली जन्मठेपेची शिक्षा

मुंबई, 29 जून : खूनाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून आरोपीवर 20 वर्षे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथील गफ्फार नामक व्यक्तीला पोलिसांनी 1999मध्ये खूनाच्या आरोपाखाली अटक केली. पण, सुनावणी दरम्यान त्याचं मानिसक संतुलन बिघडल्याचं न्यायालयाच्या लक्षात आलं. यावेळी त्याच्यावर उपचार करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आणि 2019मध्ये गफ्फारला ज्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. मुख्य बाब म्हणजे उपचारादरम्यान गफ्फार हा जेलमध्येच होता.

काश्मिरात दहशतवाद्यांमध्ये फूट; एकमेकांच्या उठले जीवावर

काय आहे प्रकरण

गफ्फार नावाच्या आरोपीनं 1999मध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथे अशोक यादव यांचा खून केला. यावेळी रस्त्याच्या कडेला अशोक मध्यरात्री झोपले असताना खून करून गफ्फार फरार झाला. अखेर खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून गफ्फारला पोलिसांनी अटक केली. पण, सुनावणी दरम्यान आरोपीचं मानसिक संतुलन बिघडल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर गफ्फारवर पहिल्यांदा 11 वर्षे उपचार करण्यात आले. पण, त्यानंतर देखील त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षात आल्यानं त्याच्यावर पुन्हा 7 वर्षे उपचार करण्यात आले. अखेर 2019मध्ये त्याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानानंतर 150 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Loading...

काय होता मानसिक आजार

गफ्फारला ,स्क्रिटजोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला होता. सुरूवातीला 11 वर्षे उपचार सुरू असताना सुनावणी तहकूब करण्यात आली होती. 2012मध्ये जेव्हा गफ्फारला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा देखील रिपोर्टनुसार तो पूर्ण बरा झाला नव्हता. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा उपचार करण्यात आले. ठाणे येथे गफ्फारवर उपचार झाले. अखेर 2019मध्ये त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. खून करताना आपण काय कृत्य करत आहोत याची पूर्ण जाणीव गफ्फारला होती असं न्यायालयानं म्हटलं आहे.

VIDEO: भरधाव कारची ट्रकला धडक, आगीत कार चालकाचा होरपळून मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...