गांधी आणि गडकरी यांच्यात Twitterवॉर; राहुल म्हणाले, जॉब्स,जॉब्स,जॉब्स

गांधी आणि गडकरी यांच्यात Twitterवॉर; राहुल म्हणाले, जॉब्स,जॉब्स,जॉब्स

  • Share this:

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची अद्याप घोषणा झाली नाही. पण त्याआधीच राजकीय वक्तव्यांची मालिकाच सुरु झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे कौतुक केले होते. मोदींच्या मंत्रिमंडळातील एक धडाडीचे नेते असल्याचे गांधींनी म्हटले होते. यावर पलटवार करत गडकरी यांनी राहुल यांना उत्तर दिले होते. आता यावर हे प्रकरण थांबण्यास हरकत नव्हती पण राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करत गडकरी यांना डिवचले आहे.

हे देखील वाचा: 'मातोश्री'वर हाय व्होल्टेज बैठक; शिवसेना आज पत्ते उघड करणार?

पहिला हल्ला राहुल गांधींचा- कौतुक आणि टोला

'नितीन गडकरींचं कौतुक आहे. कारण भाजपमध्ये बोलण्याची हिंमत असलेले ते एकमेव नेते आहेत,' असे ट्वीट राहुल यांनी केले होते. कृपया आता तुम्ही राफेल, अनिल अंबानी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि घटनात्मक संस्थांचे केले जाणारे खच्चीकरण याबद्दल बोलावे असे त्यांनी म्हटले होते.

गडकरींचे उत्तर- तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही

राहुल गांधी यांनी एकीकडे गडकरींचे कौतुक करत असताना मोदी सरकारवर टीका केली होती. याचे उत्तर देताना गडकरी म्हणाले होते की, माझ्या हिंमतीसाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असताना देखील तुम्हाला आमच्या सरकारवर टीका करण्यासाठी माध्यमांमधील बातम्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

राहुल गांधी यांचा पुन्हा हमला

गडकरी यांनी दिलेल्या उत्तरानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा ट्वीट करत गडकरींना टोला लगावला. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरलो ती म्हणजे जॉब्स,जॉब्स, जॉब्स. राहुल यांच्या ट्वीटवरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. जॉब्स हा शब्द त्यांनी नेमका कशासाठी वापरला आहे. मोदी सरकारला नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्यात आलेले अपयश की गडकरी यांनी दिलेल्या उत्तराला लगावलेला टोला.

LIVE मर्डर : तेरी-मेरी यारी संपली, मित्रावर 16 वार करून केली हत्या

First published: February 5, 2019, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading