Home /News /national /

BREAKING : काश्मीरच्या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या घरावर दहशतवाद्यांचा गोळीबार, अमरीन भटचा खून

BREAKING : काश्मीरच्या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या घरावर दहशतवाद्यांचा गोळीबार, अमरीन भटचा खून

जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही कलाकार अमरीन भट हिच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    श्रीनगर, 25 मे : काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची बातमी आज समोर आली. त्यानंतर काश्मीरमधील आणखी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूरा गावात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक महिला आणि तिचा 10 वर्षांचा पुतणा जखमी झाला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित महिला ही प्रसिद्धी टीव्ही मालिका स्टार अंबरीन असल्याची माहिती समोर आली. अंबरीन ही सोशल मीडियावरही प्रचंड प्रसिद्ध आहे. सुरुवातीला अंबरीनची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. पण आता अंबरीनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या हत्येच्या या घटनेवर बडगाम जिल्ह्यासह संपूर्ण काश्मीरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना ही आज संध्याकाळी घडली. चदूराच्या हिश्रू भागात अंबरीनच्या घराबाहेर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात अंबरीन गंभीर जखमी झाली. आरोपी दहशतवादी अंबरीनवर गोळीबार केल्यानंतर पळून गेले. दहशतवादी पळून गेल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अंबरीन आणि तिच्या 10 वर्षाच्या पुतण्याला रुग्णालयात उपचारासाठी नेलं. दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. सुरुवातीला अंबरीनची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आली होती. पण नंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर तिच्या पुतण्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?) संबंधित घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. अंबरीनवर गोळीबार नेमका कुणी केला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच पोलीस आरोपींचा युद्ध पातळीवर शोध घेत आहेत. अंबरीन ही बडगाम जिल्ह्यातील कोंगोईपोरा-हुश्रू येथील रहिवासी खजर भट यांची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. अंबरीन ही काश्मीरी पंडीत होती का? त्यातून तिची हत्या करण्यात आली का? की त्याच्या हत्येमागे आणखी दुसरं काही कारण होतं? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान, संबंधित घटनेमागे एका दहशतवादी संघटनेचे तीन अतिरेकी होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांच्या तपासातून समोर आली आहे. तीनही आरोपींना शोधण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. पोलिसांकडून शोध मोहिम सुरु आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या