मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला न्यूज अँकर, नात्याच्या आड येणाऱ्या बायकोला संपवलं!

टीव्ही चॅनलच्या एका अँकरने सोबत काम करणाऱ्या महिलेबरोबर संबंध असल्यामुळे पत्नीची हत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 02:45 PM IST

मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला न्यूज अँकर, नात्याच्या आड येणाऱ्या बायकोला संपवलं!

इटावा (उत्तर प्रदेश), 18 ऑक्टोबर : सध्या गुन्हेरागीने तख्त गाठला असताना आता गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इटावा पोलिसांनी एक गंभीर गुन्ह्याचा खुलासा केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या अँकरसह तिघांना पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही चॅनलच्या एका अँकरने सोबत काम करणाऱ्या महिलेबरोबर संबंध असल्यामुळे पत्नीची हत्या केली आहे.

अजितेश असं आरोपीचं नाव असून त्याच्यासह महिला मित्र भावना आर्य आणि अखिलेश सिंग यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तर दिव्या असं मृत पत्नीचं नाव आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृतक दिव्याच्या मोबाइलने हत्येचे रहस्य उघड केलं आहे. सुरवातीपासूनच पोलिसांना भीती होती की ही हत्या अगदी जवळच्या एखाद्याने केली आहे. त्यामुळे पोलीस पहिल्या दिवसापासूनच त्या दिशेने तपास करत होते. 30 सप्टेंबर रोजी चॅनलमधून अजितेशने कामाचा राजीनामा दिला होता. या हत्येच्या कटामध्ये अजितेशसोबत त्याच्या चॅनेलमधील एक साथीदार अखिलेश सिंगही होता.

इतर बातम्या - 'मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे', जाहीर सभेत शरद पवार आक्रमक

दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश सिंग मृतक दिव्याचा भाऊ म्हणून राहायचा. नोएडामध्ये राहत असताना दिव्यानेही त्याला राखी बांधली होती. सोमवारी अखिलेशने कटरा बालसिंग इथल्य़ा अजितेशच्या घरी दिव्याची हत्या केली. तर या सगळ्या धक्कादायक प्रकरणचा खुलासा केल्यानंतर एसएसपीने खुलासा करणार्‍या पथकाला 15,000 रुपयांचं बक्षीसही दिलं आहे.

कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील कटरा बालासिंह मोहल्ला इथल्या सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोदकुमार मिश्रा यांची सून दिव्या हिचा सोमवारी भर दिवसा राहत्या घरात खून झाला. प्रमोद मिश्रा त्यावेळी शाळेत आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. घरात सून आणि म्हातारी आई राहत होती. प्रमोद मिश्रा दीडच्या सुमारास घरी परतले तेव्हा त्यांनी दिव्याला आवाज दिला. खोली बंद असल्याने ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. दिव्या तिसर्‍या मजल्यावर राहत होती. नंतर, जेव्हा त्यांनी दार उघडलं तेव्हा त्यांना धक्का बसला. या संपूर्ण प्रकाराची त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

Loading...

इतर बातम्या - Weather Update: मान्सूनची एक्झिट पण पाऊस सुरूच, आज या जिल्ह्यांत मुसळधार बरसणार!

एसएसपींनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजितेश मिश्रा, अखिलेशकुमार सिंह, निरंजनकुमार सिंग, फरीदाबाद आणि भावना आर्या यांचा समावेश आहे. तर पोलीस प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

इतर बातम्या - PMC बँक खातेधारकांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...