पाहा VIDEO : वॉटरपार्कमध्ये आली 'त्सुनामी'सारखी लाट, 44 जण जखमी

पाहा VIDEO : वॉटरपार्कमध्ये आली 'त्सुनामी'सारखी लाट, 44 जण जखमी

एका वॉटरपार्कमधल्या नादुरुस्त यंत्रणेमुळे त्सुनामीसारखी लाट उठली आणि या दुर्घटनेत 44 जण जखमी झाले. चीनमधल्या एका वॉटरपार्कमध्ये हा अपघात झाला. या अपघाताच्या ठिकाणी शूट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सगळेजण सैरावैरा पळताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : एका वॉटरपार्कमधल्या नादुरुस्त यंत्रणेमुळे त्सुनामीसारखी लाट उठली आणि या दुर्घटनेत 44 जण जखमी झाले. चीनमधल्या एका वॉटरपार्कमध्ये हा अपघात झाला. या अपघाताच्या ठिकाणी शूट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सगळेजण सैरावैरा पळताना दिसत आहेत.वॉटरपार्कमधल्या लोकांची जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ झाली.

चीनमधल्या शुयुं वॉटर पार्कमध्ये ही घटना घडली. इथल्या वेब मशीनमध्ये अचानक काहीतरी बिघाड झाला. यामुळे 10 फूट उंचीची लाट निर्माण झाली. ही लाट इतकी वेगाने आली की लोक बाहेर फेकले गेले. या व्हिडिओमध्ये लोक मोठमोठ्याने ओरडताना दिसतायत.

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

वॉटरपार्कच्या या यंत्रणेमध्ये अचानक लाइट गेल्यामुळे बिघाड झाला आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मशीन बिघडलं. या अपघातात सापडलेल्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. आता मात्र त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वॉटरपार्कमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आल्यावर तिथे डुंबणाऱ्या लोकांनी पळायला सुरुवात केली. या चेंगराचेंगरीत काहीजण जखमी झाले. पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या शाळेत फी ऐवजी मागतात ‘वेस्ट प्लॅस्टिक’, यानंतरच मिळतं शिक्षण

================================================================================================

VIDEO: नितीन गडकरींना राष्ट्रगीतावेळी पुन्हा आली भोवळ

Published by: Arti Kulkarni
First published: August 1, 2019, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading