बंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी

बंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी

या लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालवर लागलं आहे. भाजपला या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. पण आपण एकाही जागेवर हरणार नाही, असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.

  • Share this:

कोलकाता, 18 एप्रिल : या लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालवर लागलं आहे. भाजपला या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. पण आपण एकाही जागेवर हरणार नाही, असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.

पश्चिम बंगालमध्ये भाजप हा त्यांचा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे ही बाब ममतांनी फेटाळून लावली. भाजपला हरवून आम्ही सगळ्या जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपण पश्चिम बंगालमध्ये 23 पेक्षा जास्त जागा जिंकू, असं म्हटलं होतं. त्यावर ममतांनी हे उत्तर दिलं आहे.

'भाजप स्वप्नं बघतंय'

भाजपने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 2 जागा मिळवल्या. विधानसभेत भाजपच्या फक्त 3 जागा आहेत. असं असताना भाजपला सगळ्यात मोठा विरोधक कसं काय मानणार, असा सवाल त्यांनी विचारला.

भाजप स्वप्नं बघत असेल तर त्यांचं स्वागत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. लोकांशी खोटं बोलून भाजप त्यांना फसवत आहे, भाजपकडे कोणतंही व्हिजन नाही, असाही आरोप त्यांनी केला.

बंगाल आणि उ. प्रदेश ठरवणार पंतप्रधान

बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांची सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यात भाजपला एक जागा जिंकणंही कठीण होईल, असा दावा त्यांनी केला. पंजाब, दिल्ली या राज्यात भाजप जिंकणं कठीण आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही भाजपची मतं कमी होतील. अशा स्थितीत ते कुठून संख्याबळ आणणार, असं त्यांनी विचारलं.

पश्चिम बंगालमध्ये चांगलं यश मिळालं तर तुम्ही कुणाला पाठिंबा देणार, असं ममतांना विचारलं तेव्हा आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. आमचा पक्ष सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा निर्णय मी एकटीने घेऊ शकत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

==================================================================================================================================================================

VIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे

First published: April 18, 2019, 8:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading