पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'चाच डंका, 7 नगरपालिकांमध्ये तृणमूल विजयी

पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'चाच डंका, 7 नगरपालिकांमध्ये तृणमूल विजयी

या सात नगरपालिकांमध्ये एकूण 148 वार्ड होते. यातले 140 वॉर्ड हे तृणमूलने तर 8 वॉर्ड भाजपने जिंकले आहे

  • Share this:

कोलकाता, न्यूज 18, 17 ऑगस्ट: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालात भाजपची दाणादाण उडाली आहे तर दुसरीकडे तृणमूलने सातही नगरपालिकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

पंसकुरा, नलहाती, हल्दिया, बुनियादपुर, दुर्गापुर, कूपर्स कॅँप आणि धुपगुरी या सात नगरपालिकांमध्ये निवडणूका झाल्या होत्या. या सात नगरपालिकांमध्ये एकूण 148 वार्ड होते. यातले 140 वॉर्ड हे तृणमूलने तर 8 वॉर्ड भाजपने जिंकले आहे. तर डाव्या आघाडीला साधं खातंही उघडता आलेलं नाही. हल्दिया, कुपर्स कँप आणि दुर्गापूर नगरपालिकांमध्ये सर्वच वॉर्डात तृणमूलचा विजय झाला आहे.

या निकालावरून अजूनतरी ममता दीदींचा करिश्मा बंगालमध्ये कायम असल्याचं दिसून येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 02:56 PM IST

ताज्या बातम्या