ट्रम्प यांची स्वीय सहाय्यक 'या' कारणामुळे बदलली, एका महिन्याला मिळायचं इतकं वेतन

ट्रम्प यांच्या कुटुंबातील काही गोष्टी मॅडेलिन वेस्टरहाऊटने उघड केल्याचं म्हटलं जात आहे. दोन महिन्यांपूर्वी मेलानिया ट्रम्प यांनी ट्विटरवरून नवीन स्वीय सहाय्यक नेमण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

  • Share this:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वीय सहाय्यक मॅडेलिन वेस्टरहाऊटला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तिनं ट्रम्प कुटुंबीयांची खासगी माहिती उघड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत व्हाइट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अमेरिकेतील सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार न्यूजर्सीत सुट्टीच्या वेळी मॅडेलिन वेस्टरहाऊटने ट्रम्प कुटुंबीयांची खासगी माहिती काही लोकांना सांगितली होती. दारुच्या नशेत तिच्याकडून ही माहिती दिली गेल्याचं समजतं.

मॅडेलिन वेस्टरहाऊट पहिल्या दिवसापासून ट्रम्प यांच्या कार्यालयात काम करते. अमेरिकन माध्यमांत तिला ट्रम्प यांची गेटकीपर म्हटलं जात होतं.

ट्रम्प यांच्या कार्यालयात मॅडेलिन ही नेहमीच पाहुण्यांसोबत दिसत असे. तिला महिन्याला 1 लाख 45 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 1 कोटी रुपये वेतन मिळत होतं.

सीबीएस न्यूजने व्हाइट हाऊसच्या सूत्रांच्या हवाल्यानं मॅडेलिन एका हेराप्रमाणं काम करत होती असं म्हटलं आहे. दोन महिन्यांपूर्वी मेलानिया ट्रम्प यांनी ट्विटरवरून नवीन स्वीय सहाय्यक नेमण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 01:04 PM IST

ताज्या बातम्या