News18 Lokmat

PM मोदींसमोर मंत्र्याने महिलेला केला चुकीचा स्पर्श

त्रिपुरामध्ये एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या समोर महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 01:07 PM IST

PM मोदींसमोर मंत्र्याने महिलेला केला चुकीचा स्पर्श

आगरतळा, 12 फेब्रुवारी: त्रिपुरामध्ये एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या समोर महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून विरोधी पक्षांनी संबंधित मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

आगरतळा येथे झालेल्या एका सभेत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देव आणि अन्य नेते उपस्थित होते. व्यासपीठावर मंत्री मनोज क्रांती देव यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी सामाजिक न्याय आणि शिक्षण मंत्री असलेल्या संतना चकमा यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. देव यांनी चकमा यांच्या कमरेला हात लावल्याचा आरोप डाव्या पक्षांनी केला आहे. महिलेला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे स्पर्श करणे चुकीचे असल्याचे डाव्या पक्षाचे नेते बिजन धर यांनी म्हटले आहे. धर यांनी देव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये देव यांनी मंत्री चमका यांच्या कमरेवर हात ठेवल्याचे दिसत आहे.


VIDEO : मिसेस मुख्यंमत्री जेव्हा बैलगाडीतून मंचावर येतात...

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...