विप्लव देव यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा दिला. देव यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका मांडली. हायकमांडने माझ्यावर विश्वास ठेवला होता. आता राजीनामा देण्यास सांगितलं. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केलीय. त्यांनी निवडणुकीला अजून वेळ आहे, असं सांगितलं. तसेच 2023 च्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा केली जाईल, असंही देव म्हणाले. ('शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त) त्रिपुरामध्ये 2018 साली भाजप सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी विप्लव देव यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात आली होती. मुख्यमंत्री बनल्यानंतर देव हे त्यांच्या विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत यायचे. या दरम्यान गेल्या महिन्यात त्रिपुरातील भाजपच्या 14 आमदारांनी हायकमांडकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार केली होती. पण त्यावेळी काही निर्णय घेण्यात आला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विनोद तावडे राज्यसभेवर जाणार? दरम्यान, विनोद तावडे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाकडून संधी दिली गेली नाही. पण त्यानंतर त्यांना पक्षबांधनीच्या कामाची जबाबदारी दिली गेली. तावडे आपलं काम चोखपणे पार पाडत असल्याने आता पक्षाकडून त्यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद तावडे राज्यसभेवर जाणार आहेत. पण याबाबत विनोद तावडे यांना आम्ही प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. "माझा राज्यसभेवर जाण्यासंदर्भात कोणताही विचार नाही. त्याप्रकारची कोणतीही चर्चा पक्ष नेतृत्वाशी झालेली नाही. मला सध्या जी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडतोय", अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी 'न्यजू 18 लोकमत'ला दिली.Loyalty is a virtue if it is directed at something greater than self-interest. Amazed to witness how without any doubts,our dedicated leader @BjpBiplab tendered his resignation to The Governor of Tripura when asked by the party leadership and will still be working dedicatedly. pic.twitter.com/vE7lZhSv1b
— Vinod Tawde (@TawdeVinod) May 14, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.