भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पक्षाच्या आमदारांचं बंड, हुकूमशहा असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी

भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पक्षाच्या आमदारांचं बंड, हुकूमशहा असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी

हे सातही आमदार दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं या बंडखोर आमदारांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली11 ऑक्टोबर: त्रिपुरामधल्या भाजप सरकारला (Tripura BJP Government)  धक्का बसला आहे. मुख्‍यमंत्री बिप्‍लव कुमार देव (Biplab kumar deb) हे हुकूमशहा असल्याचा आरोप करत 7 आमदारांनी (BJP MLA) बंडाचं निशाण फडकवलं आहे. हे सातही आमदार दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. आमचं बंड हे पक्षाच्या विरोधात नसून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असल्याचं या आमदारांनी म्हटलं आहे. देव यांची कार्यपद्धती ही चुकीची असून ते आमदारांना डावलत असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

सुदीप रॉय बर्मन  यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदार दिल्लीत तळ ठोकून असून आणखी दोन आमदारांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा बर्मन यांनी केला आहे. त्रिपुरा विधानसभेत भाजपचे 36 आमदार आहेत त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही. मात्र आमदारांमधला असंतोष पसरला तर ते भाजपला महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत आलेल्या 7 बंडखोर आमदारांमध्ये सुशांत चौधरी, आशीष साहा, आशीष दास, दीवा चंद्र रांखल, बुर्ब मोहन त्रिपुरा, परिमल देब बरम,  राम प्रसाद पाल आणि सुदीप रॉय बर्मन यांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची देवाप्रमाणे पूजा करायचा 'हा' भारतीय, हार्ट अटॅकने मृत्यू

कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार यांची अनेक दशकांची सत्ता उलथवून टाकत भाजपने त्रिपुरात आपलं सरकार स्थापन केलं होतं. त्याची देशभर चर्चाही झाली होती. त्यानंतर बिप्लव कुमार देव यांची पक्षाने मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले देव यांची पक्षाने मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती.

नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना', महाराष्ट्राला महिनाभरात मिळणार लाभ

केंद्रीय नेतृत्वाचाही देव यांच्यावर विश्वास असल्याने त्यांना धोका नसल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत आलेल्या बंडखोर आमदारांचं म्हणणं ऐकून त्यांचं मन वळविण्यात यश येईल अशी आशा भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. कोविडचं संकट त्यामुळं आलेली आर्थिक मंदी यांचं संकट असताना आमदारांनी जास्त ताणून धरू नये असं भाजपच्या श्रेष्ठींनी आमदारांना सांगितं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 11, 2020, 3:53 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या