Triple Talaq : आमच्याकडे स्त्रियांना मारहाण किंवा जिवंत जाळत नाहीत – आझम खान

Triple Talaq Bill In Lok Sabha : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर केल्यानंतर त्यावरून गदारोळ झाला.

Triple Talaq Bill In Lok Sabha : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर केल्यानंतर त्यावरून गदारोळ झाला.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 जून : कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी अधिवेशनादरम्यान लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर केलं. त्यावरून विरोधकांनी गदारोळ देखील केला. यानंतर समाजवादी पार्टीचे रामपूरमधील खासदार आझम खान यांना विचारले असता त्यांनी, मी आणि माझा पक्ष कुरानमध्ये लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय, हे सारं प्रकरण धार्मिक आहे त्याचा कोणताही राजकीय संबंध नसल्याचं आझम खान यांनी म्हटलं आहे. इस्लाम धर्मामध्ये महिलांना देण्यात आलेले अधिकार इतर कोणत्याही धर्मानं दिलेले नाहीत. 1500 वर्षे जुना असलेला इस्लाम हा एकमेव धर्म आहे ज्यानं महिलांना समान अधिकार दिले आहेत. अशा प्रकारचे अधिकार इतर कोणत्याही धर्मानं महिलांना दिले नसल्याचा दावा आझम खान यांनी केला आहे. शिवाय, तलाक आणि महिलांना होणाऱ्या मारहाणीचे सर्वात कमी प्रकार केवळ इस्लाममध्ये धर्मामध्ये होत असल्याचा दावा आझम खान यांनी केला. तर, आमच्याकडे स्त्रियांना मारहाण किंवा जिवंत जाळत नाहीत असं देखील आझम खान यांनी म्हटलं. मुद्दा धार्मिक तिहेरी तलाकचा मुद्दा हा धार्मिक आहे त्याला राजकीय रंग देता कामा नये. मुसलमानांसाठी कुरानपेक्षा काहीही मोठं नाही. लग्न असो अथवा तलाक सर्व गोष्टी या कुरानमध्ये सांगितल्याप्रमाणे होत असल्याचं आझम खान यांनी म्हटलं आहे. ओवैसी, थरूर यांचा विरोध Triple Talaq Bill मांडल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला. तिहेरी तलाक विधेयक हे घटनाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केली. यावेळी चर्चेदरम्यान गोंधळ देखील झाला. यावर चर्चा करताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैंसी यांनी मुस्लीम महिलांबद्दल प्रेम दाखवता. मग शबरीमालाला विरोध का? असा सवाल सरकारला केला. तसंच पतीला तुरूंगात टाकल्यानंतर पत्नीला पोटगी कोण देणार? असा सवाल देखील यावेळी ओवैंसी यांनी उपस्थित केला. दरम्यान, कायदा करणं हे सरकारचं कर्तव्य असून मुस्लीम महिलांचं संरक्षण केलं जाईल असं कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. VIDEO : काँग्रेस आमदार पोलिसांवर भडकले, सभागृहात केला बापाचा उल्लेख
    First published: