तिहेरी तलाक द्यायचाय तर आधी तुरुंगात जा

तिहेरी तलाक द्यायचाय तर आधी तुरुंगात जा

मुस्लीम समाजातील तोंडी तलाक देणे हा गुन्हा समजला जाईल

  • Share this:

नवी दिल्ली, २० सप्टेंबर- तिहेरी तलाकच्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता तिहेरी तलाक दिला तर थेट तुरुंगात रवानगी होऊ शकते. तसेच आरोप सिद्ध झाला तर तीन वर्षांचा तुरूंगवास आणि आर्थिक दंडही होऊ शकतो. याबाबतचं विधेयक राज्यसभेत मंजूर न होऊ शकल्यानं केंद्र सरकारनं काल अध्यादेश काढला. या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. दोन अधिवेशनांमध्ये मंजूर न होऊ शकलेल्या 'तिहेरी तलाक'च्या संदर्भातील अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकारनं घेतला.

आज रात्री मध्यरात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरीही केली. यामुळे मुस्लीम समाजातील तोंडी तलाक देणे हा गुन्हा समजला जाईल. या अध्यादेशा अंतर्गत तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर होऊन राज्य सभेकडे पाठवण्यात आलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. अखेर राज्यसभेत विधेयक रखडल्याने अध्यादेश काढण्यात आला होता. तिहेरी तलाकामधील नवऱ्याला तीन वर्षांच्या शिक्षेबाबत कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यचीही मागणी कॉंग्रेसने केली होती. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. या अध्यादेशानंतर तिहेरी तलाक देणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे.

तरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, पाहा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 10:39 AM IST

ताज्या बातम्या