नवी दिल्ली, 21 जून : संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तहेरी तलाक विधेयक मांडलं. त्यानंतर चर्चेदरम्यान लोकसभेत विरोधकांनी गोंधळ केला. महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक हे लोकसभेत मांडण्यात आलं. पण, काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला. तिहेरी तलाक विधेयक हे घटनाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केली. यावेळी चर्चेदरम्यान गोंधळ देखील झाला. यावर चर्चा करताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैंसी यांनी मुस्लीम महिलांबद्दल प्रेम दाखवता. मग शबरीमालाला विरोध का? असा सवाल सरकारला केला. तसंच पतीला तुरूंगात टाकल्यानंतर पत्नीला पोटगी कोण देणार? असा सवाल देखील यावेळी ओवैंसी यांनी उपस्थित केला. दरम्यान, कायदा करणं हे सरकारचं कर्तव्य असून मुस्लीम महिलांचं संरक्षण केलं जाईल असं कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
Union Law & Justice Minister & BJP leader Ravi Shankar Prasad after Triple Talaq Bill 2019 introduced in Lok Sabha: People have chosen us to make laws. It is our work to make laws. Law is to give justice to the victims of Triple Talaq. https://t.co/M3mkPpLlH2
यापूर्वी देखील दोन वेळा तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होतं. दरम्यान, काँग्रेसनं देखील तिहेरी तलाक विधेयकाला आपला विरोध दर्शवला आहे. या विधेयकामध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनामध्ये तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणार का हे पाहावं लागणार आहे.