ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी

ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी

'लोकसभेत तिहेरी प्रतिबंधक विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहेत'

  • Share this:

28 डिसेंबर : मुस्लिम महिलांची तिहेरी तलाक प्रथेतून आता सुटका होण्यासाठी मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. लोकसभेत तिहेरी प्रतिबंधक विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आता राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे.

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलंय. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलंय. या विधेयकानुसार तिहेरी तलाक घेणाऱ्याला 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली गेलीय. एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी आणि मुस्लिम लीगने या विधेयकाला विरोध केला होता. अखेर असाउद्दीन ओवेसी यांच्या सुचना घेऊन संध्याकाळी मतदान करण्यात आलंय. यावेळी ओवेसींच्या सुचना फेटाळण्यात आल्या.

सर्व सदस्यांच्या एकमताने तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकारने पहिल्या टप्यातील लढाई जिंकल्यानंतर आता राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावर शिक्कामोर्तब होणे गरजेचं आहे. राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी हे विधेयक पाठवले जाईल त्यानंतर तिहेरी तलाक प्रतिबंध कायदा अस्तित्वात येईल.

 तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक

- मुस्लिम महिला (विवाहसंबंधी हक्कांचं संरक्षण) विधेयक 2017

- तोंडी तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) कायद्यानं गुन्हा

- तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद

- तिहेरी तलाक दिलेल्या महिलेला पोटगीची तरतूद

- महिला आपल्या मुलांचा ताबा मिळण्याची मागणी करू शकते

- मुलांच्या ताब्यावर न्याय दंडाधिकारी देणार निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 07:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading