तिहेरी तलाकचे काय होणार? राज्यसभेत चर्चा सुरू!

तिहेरी तलाकचे काय होणार? राज्यसभेत चर्चा सुरू!

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता या ऐतिहासिक विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता या ऐतिहासिक विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू झाली आहे. यासाठी भाजपने व्हिप जारी केला असून सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभेत गुरुवारी या विधेयकावर चर्चा झाली होती. दिवसभर चर्चा झाल्यानंतर त्याला मंजूरी मिळाली होती. लोकसभेने हे विधेयक 303 विरुद्ध 82 मतांनी मंजूर केले होते. काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी, टीडीपी आणि जेडीयू या पक्षांनी लोकसभेत विधेयकाला विरोध केला होता.

राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली आदींनी भाग घेतला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना केंद्रीय अप्लसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तरे दिली.

लोकसभेत सरकारकडे बहुमत असल्यामुळे तिहेरी तलाक विधेयक सहज मंजूर झाले. पण राज्यसभेत मात्र हे विधेयक मंजूर होण्यासाठी भाजपला एनडीए आणि अन्य विरोधी पक्षांची गरज लागेल. राज्यसभेत NDA किंवा UPA या दोघांकडे बहुमत नाही. त्यामुळे NDAला UPA सोबत नसलेल्या पक्षांच्या मदतीची गरज लागणार आहे.

अशी आहे राज्यसभेतील परिस्थिती

राज्यसभेतील संख्याबळाचा विचार करता सभागृहातील सदस्य संख्या 245 इतकी आहे. पण सध्या यातील 4 जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकूण संख्याबळ 241 इतके होते. यातील एनडीएचे संख्याबळ 113 इतके आहे. तर काँग्रेस आणि युपीएतील अन्य पक्षांकडे मिळून 68 खासदार आहेत. याशिवाय एनडीए आणि युपीए वगळता अन्य पक्षांकडे 42 खासदार आहेत. या 42 पैकी 18 जण भाजपच्या सोबत देखील नाहीत आणि विरोधात देखील नाहीत. भलेही राज्यसभेत एनडीएकडे बहुमत नसले तरी तिहेरी तलाक विधेयक बाबत त्यांचे पारडे जड आहे.

VIDEO: सत्तेच्या बाजूने असल्याशिवाय पर्याय नाही, राजीनाम्यानंतर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या