मुलीला जन्म दिला म्हणून महिलेला दिला तलाक; पतीच्या विरुद्ध गुन्हा!

मुलीला जन्म दिला म्हणून महिलेला दिला तलाक; पतीच्या विरुद्ध गुन्हा!

Triple Talaq Bill : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर करून चर्चा सुरू असताना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पत्नीनं मुलीला जन्म दिला म्हणून म्हणून नवऱ्यानं महिलेला तलाक दिला.

  • Share this:

लखनऊ, 21 जून : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर करून चर्चा सुरू असताना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पत्नीनं मुलीला जन्म दिला म्हणून म्हणून नवऱ्यानं महिलेला तलाक दिला. याप्रकरणात पीडित महिलेनं पतीसह पाच लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बुलंदशहरातील पहासू पोलीस ठाण्यातंर्गत ही घटना घडली आहे. आसिया उर्फ आशा असं या महिलेचं नाव आहे. 10 वर्षापूर्वी आसिया यांचा विवाह अलिगढजवळ राहणाऱ्या अंन्सार अहमदशी झाला. विवाहानंतर दोघांना चार मुली झाल्या पैकी दोन मुलींचा मृत्यू झाला. मुली होत असल्यानं सासरच्या लोकांनी आसिया यांचा छळ केला. त्यांना मानसिक आणि शारिरीक त्रास दिला. शिवाय, उपाशी देखील ठेवलं गेलं. पण, आता देखील मुलगी झाल्यानं पती अंन्सार अहमदनं आसिया यांना तलाक दिला.

मारहाणीचा आरोप

दरम्यान, आसिया यांच्या भावानं आसिया यांना मारहाण केल्याचं देखील तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर त्यांना गावातील शाळेत सोडण्यात आलं. तसंच पोलिसांकडून देखील न्याय मिळत नसल्याचा आरोपा आसिया यांच्या भावानं केला आहे. पण, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस साऱ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Triple Talaq : आमच्याकडे स्त्रियांना मारहाण किंवा जिवंत जाळत नाहीत – आझम खान

ओवैसी, थरूर यांचा  ला विरोध

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत Triple Talaq Bill मांडल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला. तिहेरी तलाक विधेयक हे घटनाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केली. यावेळी चर्चेदरम्यान गोंधळ देखील झाला. यावर चर्चा करताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैंसी यांनी मुस्लीम महिलांबद्दल प्रेम दाखवता. मग शबरीमालाला विरोध का? असा सवाल सरकारला केला. तसंच पतीला तुरूंगात टाकल्यानंतर पत्नीला पोटगी कोण देणार? असा सवाल देखील यावेळी ओवैंसी यांनी उपस्थित केला. दरम्यान, कायदा करणं हे सरकारचं कर्तव्य असून मुस्लीम महिलांचं संरक्षण केलं जाईल असं कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

VIDEO : काँग्रेस आमदार पोलिसांवर भडकले, सभागृहात केला बापाचा उल्लेख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: talaq
First Published: Jun 21, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...