S M L

सरकार उद्या लोकसभेत तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक मांडण्याची शक्यता

उद्या होणारं कामकाज, या यादीमध्ये आज कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक लोकसभेत मांडतील असं संसदेच्या वेबसाईटवर म्हटलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 21, 2017 10:45 AM IST

सरकार उद्या लोकसभेत तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक मांडण्याची शक्यता

21 डिसेंबर: तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या वेबसाईटवर तसा उल्लेखही आहे.

उद्या होणारं कामकाज, या यादीमध्ये  कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक लोकसभेत मांडतील, असं म्हटलंय. सर्व भाजप खासदारांनी उद्या  लोकसभेत उपस्थित रहावं, असा व्हिपच पक्षानं काढल्याचं कळतंय. सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट महिन्यात तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवलं होतं.  तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा तुम्ही आणणार का, आणलात तर ते बरं होईल, असं कोर्टानं सुचवलं होतं. या विधेयकानुसार, तोंडी तलाक देणं अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

तिहेरी तलाकचा लढा फार जुना आहे.  1980च्या दशकात शहनवाझ बानोने हा मुद्दा कोर्टात उचलला होता. तेव्हा मात्र राजीव गांधींनी या तिहेरी तलाक विरूद्ध जाण्यास नकार दिला होता. आता मात्र  सुप्रीम कोर्टात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने हा कायदाच  घटनाबाह्य ठरवलाय. अनेक मुस्लिम देशांमध्ये देखील तिहेरी तलाकचा कायदा पाळला जात नाही. पाकिस्तान,इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये हा कायदा अस्तित्वात नाही. तिथे कोर्टाच्या मदतीनेच घटस्फोट होतात. पट भारतासारख्या धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाहीत मात्र इतके वर्ष हा कायदा    आतापर्यंत अस्तित्वात होता. पण तरीही मुस्लिम संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची निंदा केली होती. तसंच या कायद्यात  कुठल्याच बदलाची गरज नसल्याचं भोपाळमधील एका सभेत सांगितलं होतं.त्यामुळे आता  जे नवीन विधेयक सरकार आणेल त्यात नक्की काय मांडलय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

काय आहे  तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक? 

Loading...

- मुस्लिम महिला (विवाहसंबंधी हक्कांचं संरक्षण) विधेयक 2017

- तोंडी तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) कायद्यानं गुन्हा

- तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद

- तिहेरी तलाक दिलेल्या महिलेला पोटगीची तरतूद

- महिला आपल्या मुलांचा ताबा मिळण्याची मागणी करू शकते

- मुलांच्या ताब्यावर न्याय दंडाधिकारी देणार निर्णय

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 10:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close