तिहेरी तलाकविरूद्ध याचिका करणाऱ्या इशरत जहाँ भाजपमध्ये!

तिहेरी तलाकविरूद्ध याचिका करणाऱ्या इशरत जहाँ भाजपमध्ये!

ट्रिपल तलाकविरोधात देशातील पाच मुस्लिम महिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल दिला

  • Share this:

  01जानेवारी:  तिहेरी तलाकविरोधात लढाई लढणाऱ्या याचिकाकर्ता इशरत जहाँ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.  शनिवारी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ट्रिपल तलाकविरोधात देशातील पाच मुस्लिम महिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक घटनाबाह्य  असल्याचा   ऐतिहासिक निकाल दिला.  आता त्यावर  लोकसभेत बिलही भाजपने पास केलं.

त्यानंतर  पश्चिम बंगालमधील हावडाच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयातील महिला मोर्चाच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी इशरत जहाँ यांना मिठाई भरवून त्यांचं पक्षात स्वागत केलं. इशरत जहाँ यांनी याआधी भाजपचं प्राथमिक सदस्यत्व घेतलं होतं.

आता यानंतर तरी भाजपला मुस्लिमांची मतं मिळवता येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: January 1, 2018, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading