जसा रामाचा जन्म अयोध्येत झाला, तसाच तिहेरी तलाक ; कपिल सिब्बलांचा युक्तिवाद

जसा रामाचा जन्म अयोध्येत झाला, तसाच तिहेरी तलाक ; कपिल सिब्बलांचा युक्तिवाद

माझा विश्वास आहे की, राम अयोध्येतच जन्मला, प्रश्न विश्वास ठेवण्यात आहे. जर प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्मले अशी धारणा असेल तर ट्रिपल तलाकही तशीच धारणा असल्याचं सिब्बल कोर्टात म्हणालेत.

  • Share this:

कौस्तुभ फलटणकर,दिल्ली

16 मे : तिहेरी तलाक 1400 वर्षांपासून अस्तित्वात आहे. 637 साली याची सुरुवात झाली, तिहेरी तलाक इस्लामविरोधी आहे हे म्हणणारे आपण कोण आहोत, असा युक्तिवाद आज (मंगळवारी) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केला. तसंच काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी तिहेरी तलाकची तुलना अयोध्येत राम जन्माशी केलीये.

ट्रिपल तलाकच्या मुद्यावरून देशभरात सध्या जोरदार चर्चा झडतेय. त्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं ट्रिपल तलाकची पद्धत ही 1400 वर्ष जुनी असल्याचा दावा सुप्रीम कोर्टात केलाय. त्यामुळेच जी परंपरा एवढी जुनी असेल तर गैरइस्लामिक कशी असेल असा सवालही लॉ बोर्डानं केलाय. त्यावर सरकारच्यावतीनं सवालही उपस्थित केले जात आहे.

सिबल यांनी तिहेरी तलाकची तुलना रामाचा जन्म अयोध्येत झाला याच्याशी केला. माझा विश्वास आहे की, राम अयोध्येतच जन्मला, प्रश्न विश्वास ठेवण्यात आहे. जर प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्मले अशी धारणा असेल तर ट्रिपल तलाकही तशीच धारणा असल्याचं सिब्बल कोर्टात म्हणालेत.

मुस्लिम लॉ बोर्डाच्या वतीने प्रसिद्ध वकिल आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल बाजू मांडतायत. त्यावरूनही काँग्रेसवर मोठी टीका होतेय. सिब्बलांनी ट्रिपल तलाकचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारे काँग्रेसनेच समर्थन केल्यासारखं असल्याची टीका होतेय.

ट्रिपल तलाकची सुनावणी पाच जजेसच्या बेंचसमोर होतेय. विशेष म्हणजे हे पाचही जजेस हे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. दोन दिवसात ही सुनावणी पूर्ण होईल. ट्रिपल तलाक संपवला तर नवीन कायदा कसा असेल याचीही चर्चा आता सुरू झालीय.

First published: May 16, 2017, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading