चंदीगड, 23 जानेवारी : हल्लेखोराने घरात घुसून आई व तिच्या दोन्ही मुलांचा गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदीगड येथील मनीमाजरा भागात एका अज्ञान व्यक्तीने घरात घुसून आई व दोन्ही मुलांची गळा कापून हत्या केली आहे. मनीमाजरा या भागातील एक इमारतीत 45 वर्षीय सरिता आपली दोन्ही मुलं 16 वर्षीय अर्जुन व 22 वर्षीय़ मुलगी सेंसी राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार सरिताचा पती संजय गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला होता. साधारण रात्री 2 वाजता पोलिसांना मनीमाजरातील मॉडर्न कॉम्पलेक्स येथील रहिवाशाकडून फोन आला व काहीतरी संशयित असल्याचे त्याने पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीस रात्री मनीमाजराच्या मॉडर्न कॉम्पलेक्समध्ये आले. तेथे दरवाज्याला बाहेरुन टाळं असल्याचं दिसलं. मात्र शेजारच्याने सांगितल्यानुसार, सरिताच्या पती संजयचा अपघात झाला होता. घरातून कोणी फोन उचलत नसल्याने त्याने मला फोन केला व घरी ही बातमी देण्यास सांगितली. मी येथे आलो तेव्हा घराला टाळं होतं, पण आतले दिवे सुरू असल्याने मला संशय आला व मी पोलिसांना फोन केला.
पोलीस टाळं तोडून आत गेल्यानंतर त्यांना सरिता व तिची दोन्ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात दिसली. त्यांचा गळा कापून हत्या केल्याचे समजते. तरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पतीने या तिघांची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्याप कोणताही पुरावा हाती आलेला नाही. याबाबत संजय याची तब्येत सुधारल्य़ास त्याच्याकडून याप्रकरणात अधिक चांगल्या पद्धतीने खुलासा करण्यात येईल.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.