ट्रिपल मर्डरनं राजधानी दिल्ली हादरली

ट्रिपल मर्डरनं राजधानी दिल्ली हादरली

Murder In Delhi : राजधानी दिल्लीमध्ये एका वृद्ध दाम्पत्याची आणि मोलकरणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जून : ट्रिपल मर्डरच्या केसनं राजधानी दिल्ली हादरून गेली आहे. रविवारी सकाळी वेस्ट दिल्लीमध्ये एका वयस्कर दाम्पत्याची आणि मोलकरणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गळा चिरून ही हत्या करण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी वेगानं तपासाला सुरूवात देखील केली आहे.

दरम्यान, ट्रिपल मर्डर हा चोरीच्या हेतूनं झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मोलकरणीसह वृद्ध दाम्पत्य या ठिकाणी राहत होतं. तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. घराबाहेर रक्त सांडलं होतं आणि त्यानंतर घरातून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी आता नातेवाईकांशी देखील संपर्क साधायला सुरूवात केली आहे.

शिक्षिकानं संपवलं परिवाराला

केवळ एक दिवसापूर्वी ट्यूशन शिक्षकानं आपल्या संपूर्ण परिवाराची हत्या केली होती. या शिक्षकानं पत्नी आणि तीन मुलांचा गळा घोटून त्याची हत्या केली. त्यानंतर चाकून गळा चिरण्यात आला होता. आर्थिक विवंचनेत असल्यानं शिक्षकानं कुटुंबाला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती या शिक्षकानं चौकशीदरम्यान दिली. त्यानंतर त्यानं स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता.

VIDEO: भररस्त्यात भरधाव तीन चाकी रिक्षा अचानक उलटली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 12:28 PM IST

ताज्या बातम्या