S M L

वडिलांना 8 वेळा, आईला 18 वेळा चाकूनं भोसकून मुलाने बहिणीचाही घेतला जीव

एका मुलाने आपल्या पित्यासह आई आणि बहिणीला चाकून भोसकून त्यांचा जीव घेतल्याचा खळबळजनक प्रकार पोलीस चौकशीत समोर आला आहे.

Updated On: Oct 11, 2018 03:16 PM IST

वडिलांना 8 वेळा, आईला 18 वेळा चाकूनं भोसकून मुलाने बहिणीचाही घेतला जीव

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : दिल्लीच्या किशनगडमध्ये एक धक्कादायक आणि निर्घृण तिहेरी हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. एका मुलाने आपल्या पित्यासह आई आणि बहिणीला चाकूनं भोसकून त्यांचा जीव घेतल्याचा खळबळजनक प्रकार पोलीस चौकशीत समोर आला आहे.

सूरज असं या आरोपी मुलाचं नाव आहे. त्याला नशा करण्याची सवय होती. तर सूरजला त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीप्रमाणे जगायचं होतं. त्याला त्याच्या आयुष्यात कोणाचीच लुडबूड नको होती. म्हणून त्याने त्याच्या कुटुंबियांना संपवलं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आरोपी सूरजनं सर्वात आधी आपल्या पित्याला 8 वेळा चाकूनं भोसकलं. पित्याला मारताना पाहिल्यावर आई जोरात किंचाळली म्हणून या सूरजने आपल्या आईला तब्बल 18 वेळा चाकून भोसकलं.हा निर्दयी मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बहिणीचा गळा दाबून तिच्यावरही 3 वेळा चाकूने वार केले. इतक्या अमानुषपणे या मुलाने आपल्याच कुटुंबियांची हत्या का केली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण हत्येच्या रात्री 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत संपूर्ण कुटुंब टीव्ही पाहत होतं. बरं इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा जुन्या फोटोंचा अल्बमही पाहिला. आरोपी सूरजने आईच्या हातची बनवलेली शेव खाल्ली. घरात एवढं हसतं वातावरण असताना असं काय झालं की  सूरजने अख्ख्या कुटुंबाची इतक्या वाईट पद्धतीने हत्या केली.

रात्री सगळे झोपल्यानंतर सूरज 3 वाजता उठला, त्यानंतर सगळ्यात आधी त्याने त्याच्या वडिलांना मारलं, नंतर आई आणि मग त्याने बहिणीचाही जीव घेतला. सगळ्यांचा खून केल्यानंतर तो सकाळी 5 वाजेपर्यंत जागत राहिला.

Loading...
Loading...

सकाळपर्यंत त्याने बाथरूममध्ये चाकू आणि हात धुतले. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने तिघांची हत्या केल्यानंतर घरातलं सामान विस्कटवलं. यासंदर्भात मुलाविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून खुनासाठी वापरलेला चाकू, आरोपी सूरजचे रक्ताळलेले कपडे, त्याचे वडील जी चादर घेऊन झोपले होती ती रक्ताने माखलेली चादर, जमिनीवरील रक्त साफ करण्यासाठी वापरलेलं वायफर, अशा अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.

'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 03:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close