Home /News /national /

मर्कज प्रकरण : अखेर जमातींनी आपली चूक केली मान्य; तब्बल 272 जणांना कोर्टाने सुनावणी शिक्षा

मर्कज प्रकरण : अखेर जमातींनी आपली चूक केली मान्य; तब्बल 272 जणांना कोर्टाने सुनावणी शिक्षा

मर्कजने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात देशातील विविध भागांपासून परदेशातूनही मोठ्या संख्येने जमाती सहभागी झाले होते

    नवी दिल्ली, 16 जुलै : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा सुरुवातीलच्या काळात दिल्लीमध्ये झालेल्या मर्कजच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा पसरल्याची बातमी समोर आली होती. या कार्यक्रमासाठी देश व परदेशातील मोठ्या संख्येने जमाती एकत्र आले आहे होते. निजामुद्दीन स्थित मर्कज प्रकरणात तब्बल 275 हून अधिक परदेशी जमातींनां कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. सांगितले जात आहे की परदेशी जमातींना टिल राइजिंग कोर्टाची एक दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्हणजेच एक दिवस कोर्ट रुममध्ये उभं राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय सर्व जमातींवर 5 ते 10,000 रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व परदेशी जमातींनी कोर्टासमोर आपली चूक कबुल केली आहे. कोरोनाच्या महासाथीत नियमांचं उल्लंघन केल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. त्यात फॉरेन एक्ट, IPS च्या अनेक कलमांचं उल्लंघन झालं आहे. हे सर्व परदेशी जमाती चीन, नेपाल, इंडोनेशीया, विजी, ऑस्ट्रेलिया आणि अन्य बाकी देशांतील आहेत. ते मर्कजमध्ये सहभागी होण्यासाठी येथे आले होते. हे वाचा-या बँकांनी बदलले मिनिमम बॅलन्स-व्यवहारासंदर्भातील नियम, 1 ऑगस्टपासून लागू होणार पोलिसांनी जून महिन्यात या प्रकरणात 36 देशांतील 956 परदेशींविरोधात 59 आरोपपत्र दाखल केले होते. परदेशी नागरिकांचे वकिलत्व घेणाऱ्या वकिलाने सांगितले की मलेशियाई नागरिकांनी आरोपांचा स्वीकार करीत शिक्षा करण्याची विनंती केली आहे. ज्यानंतप मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट सिद्धार्थ मलिक यांनी आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्ता लाजपत नगरातील एसडीएम लाजपत नगरातील अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि निजामुद्दीनचे निरीक्षकांनी सांगितले की त्यांनी याचिकेवर काही प्रश्न नाही. ज्यानंतर त्यांना सोडण्याची परवानगी देण्यात आली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या