उत्तर भारतात अनेक ठिकाणी भुकंपाचे धक्के

उत्तर भारतात अनेक ठिकाणी भुकंपाचे धक्के

या भुकंपांमुळे भारतात अजूनतरी कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.

  • Share this:

09 मे: उत्तर भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान या भुकंपाचा केंद्रबिंदू  हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये  असल्याची माहिती मिळते आहे.

या  भूकंपांमुळे भारतात अजूनतरी कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.    अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये मात्र  भूकंपामुळे पळापळ झाली आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये झालेल्या भुकंपाची  तीव्रता 6.2

रिश्टर स्केल इतकी होती.त्यानंतर भारतात उत्तर भारतात अनेक ठिकाणी भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात दिल्ली ,पंजाब, चंदीगड, हरयाणा,जम्मू आणि हिमाचलच्या काही भागांचा समावेश आहे.

भूकंपाचे झटके सर्वप्रथम काश्मिरमध्ये 4च्या आसपास जाणवले .त्यानंतर दिल्लीत जाणवले. आता या भूकंपाचा अजून काही परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2018 06:04 PM IST

ताज्या बातम्या