आरेमध्ये झाडांची कत्तल पण काय म्हणाले केंद्रीय पर्यावरण मंत्री?

आरेमध्ये झाडांची कत्तल पण काय म्हणाले केंद्रीय पर्यावरण मंत्री?

मुंबई मेट्रो - 3 च्या कारशेडसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याच्या विरोधात पर्यावरणवाद्यांचं आंदोलन सुरूच आहे पण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र त्याचं समर्थन केलं आहे.

  • Share this:

लखनौ, 5 ऑक्टोबर : मुंबई मेट्रो - 3 च्या कारशेडसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याच्या विरोधात पर्यावरणवाद्यांचं आंदोलन सुरूच आहे पण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र त्याचं समर्थन केलं आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्यानंतर शुक्रवारी रात्रीच आरे कॉलनीतली झाडं तोडण्यात आली. आरे कॉलनी हे वनक्षेत्र नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे, याची आठवण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी करून दिली. जे वनक्षेत्रात आहे ती झाडं तोडण्याची परवानगी नाही, असं ते म्हणाले.

मुंबई मेट्रोप्रमाणेच दिल्ली मेट्रोसाठीही झाडं तोडण्यात आली होती. मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी 20 ते 25 झाडं तोडण्यात आली. त्यावेळीही लोकांनी विरोध केला होता पण एका झाडाच्या जागी 5 झाडं लावण्यात आली, असंही त्यांनी ठासून सांगितलं.

रातोरात तोडली 700 झाडं

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधली वृक्षतोड करण्याच्या विरोधातली याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं रातोरात जवळपास 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली. ही माहिती मिळताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आरेमध्ये धाव घेतली आणि ठिय्या आंदोलन केलं. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना न जुमानता पोलीस आणि प्रशासनाने कारवाई केली.

(हेही वाचा : आरेत रात्री केलेल्या झाडांच्या कत्तलीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले? पाहा VIDEO)

आंदोलन करणाऱ्या जवळपास 100 जणांना पहाटेच्या सुमाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आरेमध्ये तणावाचं वातावरण आहे. आरेचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

=============================================================================================

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-411614" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDExNjE0/"></iframe>

Published by: Arti Kulkarni
First published: October 5, 2019, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading