एका झाडाच्या मृत्यूने 100 घरटी उद्ध्वस्त, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

झाड कापल्यानंतर पक्षी तुटलेल्या घरट्याभोवती घिरट्या मारत होते. तर काही पक्षी पिलांजवळ आणि फुटलेल्या अंड्यांजवळ बसून होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 12:50 PM IST

एका झाडाच्या मृत्यूने 100 घरटी उद्ध्वस्त, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

पलक्कड, 06 ऑक्टोबर : मुंबईतील आरे जंगलातील दोन हजार झाडे तोडण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना केरळमध्येही अशाच एका प्रकाराने सर्वांना हैराण केलं आहे. केरळमधील पलक्कड रेल्वे स्टेशन परिसरातील एक गुलमोहराचं झाड कापल्याप्रकरणी रेल्वे अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याझालावर 100 पेक्षा जास्त पक्ष्यांची घरटी होती. झाड काढल्यानं त्यांचा निवाराच हिरावून घेतला गेला.

एक ऑक्टोबरला पलक्कड रेल्वे स्टेशन परिसरातील गुलमोहराचं झाड कापण्यात आलं. गुलमोहराचं हे झाड बरंच जुनं होतं. या झाडावर शंभरपेक्षा जास्त पक्ष्यांनी घरटं बांधलं होतं. झाड कापल्यानं घरटी तुटली तर काही घरट्यांमध्ये असलेली अंडीही पडून फुटली. झाड कापल्यानंतर पक्षी तब्बल दोन दिवस तिथंच बसले होते. त्यांची नजर त्या उद्ध्वस्त झालेल्या घरट्यात काहीतरी शोधत होती.

रेल्वे परिसरात कापण्यात आलेल्या झाडाबद्दल जेव्हा पर्यावरण कार्यकर्त्यांना समजलं तेव्हा त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकारी आणि झाड कापणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पर्यावरणवाद्यांनी म्हटलं की, वन विभागाने झाड कापण्यापूर्वी परवानगी घ्यायला हवी होती. मात्र त्यांनी असं काहीही केलं नाही.

Loading...

पक्षांच्या प्रजनन काळात कोणतंही झाड कापण्यापूर्वी वनविभागाला त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर वन विभाग संबंधित ठिकाण, झाड यांचे निरीक्षण करते. झाडावर पक्ष्यांचे घरटे किंवा अंडी नाहीत याची खात्री केल्यानंतरच झाड कापण्याची परवानगी दिली जाते.

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: india
First Published: Oct 6, 2019 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...