Pulwama हल्ल्याचा असाही निषेध, पर्यटकांनी रद्द केल्या काश्मीर टूर्स

Pulwama हल्ल्याचा असाही निषेध, पर्यटकांनी रद्द केल्या काश्मीर टूर्स

पर्यटनातून मिळणारा पैसा विकासापेक्षा दहशतवाद्यांच्या मदतीसाठी अधिक होत असल्याने नाशिक ट्रॅव्हल्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 19 फेब्रुवारी : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता पर्यटकांनीही कश्मीर टूर कॅन्सल करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच स्थानिकांचा हल्ल्यातील सहभागाचा निषेध म्हणून पर्यटकांनी हा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील पर्यटन संस्थानी देखील कश्मीर टूर कॅन्सल केल्या आहे.

जम्मू कश्मीर खोर्‍यातील अशांतता तसेच पुलवामा हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीती बरोबरच नाराजी देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभरातून श्रीरीनगरला जाणार्‍या पर्यटकांनी आपले टूर पॅकेज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधून देखील शेकडो पर्यटक आपले कश्मीर टूर रद्द करत आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून पर्यटकांनी हा निर्णय घेतला आहे.

पर्यटकांबरोबरच नाशिकमधील ट्रॅव्हल्स कंपन्यांनीदेखील या पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून कश्मीर टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कश्मीरला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून कश्मीर ऐवजी शिमला, मनाली, दार्जिलिंग, सिक्किम, मनिपुर आदी पर्यटन स्थळं सुचवली जात आहेत.

पर्यटनातून मिळणारा पैसा विकासापेक्षा दहशतवाद्यांच्या मदतीसाठी अधिक होत असल्याने नाशिक ट्रॅव्हल्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर कश्मीरसाठी बुकिंग केलेल्या पर्यटकांचे पैसेही विमान कंपन्या परत करत आहे. त्यामुळे पर्यटक कश्मीर वगळून देशातील इतर पर्यटन स्थळांना अधिक प्राधान्य देत आहे. पर्यटक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या या निर्णयामुळे कश्मीरच्या अर्थकारणावर येत्या काही दिवसात मोठा परिणाम होणार आहे.

Pulwama Attack: आमच्यावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार, इम्रान खान यांची भारताला धमकी

कोणताही पुरावा न देता भारत पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या नावाने बोट मोडत आहे, अशा प्रकारची टीका करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आरोप केले. पण त्यावर मी तातडीने उत्तर दिले नाही. कारण सौदीचे राजे पाक दौऱ्यावर होते. पाकिस्तानमधील गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाची परिषद होती आणि तेव्हा मी बोललो असतो तर सर्व लक्ष त्या परिषदेवरून दुसरीकडे गेले असते.

पुलवामा हल्ल्या झाल्यानंतर कोणताही पुरावा न देता भारताने पाकिस्तानवर आरोप केला. आमच्या देशात इतक्या महत्त्वाची बैठक सुरु असताना आम्ही अशा कृतीचा कसा काय विचार करु, असा उलट सवाल इम्रान यांनी भारताला विचारला. सौदीचे राजे पाकिस्तान भेटीवर नसते तरी पुलवामा सारखा हल्ला करुन आम्हाला काय फायदा होणार. पाकिस्तान गेल्या 15 वर्षापासून दहशतवादाचे चटके सहन करत आहे. तब्बल 70 हजार नागरिक त्यात मारले गेले आहेत, असे इम्रान यांनी सांगितले.

VIDEO : आमच्यावर आक्रमण करण्याचा भारतानं विचारही करू नये - इम्रान खानट

First published: February 19, 2019, 4:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading