Home /News /national /

केरळमध्ये ट्रान्सजेंडर जोडप्याला देहदान करण्याची परवानगी, आवश्यक अर्जात सुधारणा

केरळमध्ये ट्रान्सजेंडर जोडप्याला देहदान करण्याची परवानगी, आवश्यक अर्जात सुधारणा

यापूर्वी देहदान करण्याबाबत लोक फारसे उत्सुक नसतात, मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे. आतापर्यत देहदान करताना स्त्री किंवा पुरुष असे दोनच पर्याय उपलब्ध होते. ट्रान्सजेंडरचा (Transgender) पर्याय उपलब्ध नसल्यानं अशा व्यक्तींना देहदान करता येत नसे.

पुढे वाचा ...
कोची, 10 ऑगस्ट: आजकाल मृत्यूनंतर देहदान (Body Donation after Death) करण्याबाबत जागरुकता वाढत असून, मोठ्या संख्येनं लोक यासाठी पुढे येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अभ्यास करण्यासाठी मृतदेहांची आवश्यकता असते. त्याकरता देहदानातून आलेले मृतदेह उपयोगी ठरतात. मात्र यापूर्वी देहदान करण्याबाबत लोक फारसे उत्सुक नसतात, मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे. आतापर्यत देहदान करताना स्त्री किंवा पुरुष असे दोनच पर्याय उपलब्ध होते. ट्रान्सजेंडरचा (Transgender) पर्याय उपलब्ध नसल्यानं अशा व्यक्तींना देहदान करता येत नसे. मात्र या व्यक्तींनाही हा अधिकार मिळावा यासाठी केरळमधील (Kerala) त्रिपथी शेट्टी (Tripathy Shetty) आणि हृतिक एम (Hrithik M) हे ट्रान्सजेंडर दाम्पत्य (Transgender Couple) गेली दोन वर्षे लढा देत होतं, त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून, त्यांनाही देहदान करण्याची परवानगी मिळाली आहे. यासाठी आवश्यक अर्जात सुधारणा करण्यात आली आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ‘आपण या जगातून गेल्यावर आपल्या नश्वर देहाचा काहीतरी उपयोग होऊ द्या, असं त्रिपथी शेट्टी म्हणतात. त्रिपथी शेट्टी एक ट्रान्सजेंडर महिला असून, तिचे पती हृतिक एम हे देखील एक ट्रान्सजेंडर पुरुष आहेत. मूळची मजेश्वरमची असलेली त्रिपथी एक उद्योजक असून, ती दागिने बनवण्याचा व्यवसाय करते तर तिरुअनंतपुरमचा असलेला हृतिक एक न्यूजरीडर आणि फिश ब्रीडर आहे. हे केरळमधील पहिलं ट्रान्सजेंडर उद्योजक जोडपं आहे. लग्नानंतर हे जोडपे कोचीमध्ये स्थायिक झाले आहे. 2019 मध्ये त्यांचे लग्न झाल्यापासून ते दोघेही मृत्यूनंतर वैद्यकीय संशोधनासाठी आपला देहदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी सरकारी यंत्रणेचा दरवाजा ठोठावत होते. याबाबत त्यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री केके शैलजा (KK Shailaja) यांची भेट घेऊन वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आपले शरीर दान करण्याची आपली सर्वांत महत्त्वाची इच्छा असल्याचं सांगितलं. त्या वेळी अवयव दान केवळ पुरुष आणि स्त्री लिंगापुरते मर्यादित होते. या जोडप्याने त्यांची छायाचित्रे आणि अन्य तपशीलांसह आरोग्य मंत्री केके शैलजा यांना यातील अडथळा दूर करण्याची विनंती केली.

भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात

त्यानंतर एप्रिल महिन्यातच त्यांना केरळ नेटवर्क ऑफ ऑर्गन शेअरिंग (KNOS-Mritha Sanjeevani) संस्थेकडून तांत्रिक त्रुटी दूर झाल्या असून, ते अवयव दानासाठी संमतीपत्र देऊ शकतात अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 5 ऑगस्ट रोजी एर्नाकुलम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानासाठीचे संमतीपत्र सादर केलं. आपत्कालीन परिस्थितीत अवयव घ्या किंवा वैद्यकीय महाविद्यालयात संशोधनासाठी संपूर्ण शरीर घ्या, अशी विनंती या दाम्पत्याने केली आहे. ट्रान्सजेंडर लोकांबद्दल अनेक प्रकारचं संशोधन केलं जात आहे, अशावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांना ट्रान्सजेंडर शरीराची एक जोडी मिळणे ही मोठी मदत होईल, अशी भावना त्रिपथी शेट्टी यांनी व्यक्त केली.

उज्ज्वला 2.0 योजना लॉन्च :1 कोटी महिलांना मिळणार मोफत गॅस, address proof ची गरज नाही

केरळ नेटवर्क ऑफ ऑर्गन शेअरिंग अर्थात केएनओएसचे (KNOS-Mritha Sanjeevani) अवयव प्रत्यारोपण समन्वयक अनीश पी. व्ही. यांनी या ट्रान्सजेंडर जोडप्यानं त्यांचं शरीर दान करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. यामुळे आता समाजात देहदानाचा प्रसार होण्यास आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी देहदानाच्या अर्जात ट्रान्सजेंडर दात्याची नोंदणी करण्याचा पर्याय नव्हता आणि ट्रान्सजेंडर देणगीदार येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या जोडप्याच्या प्रयत्नांमुळे रजिस्ट्रीमध्ये बदल करून स्त्री, पुरुष यासह ट्रान्सजेंडर हा पर्यायही समाविष्ट करण्यात आला, असं अनीश पी. व्ही. यांनी सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Dead body, Kerala, Transgender

पुढील बातम्या