मराठी बातम्या /बातम्या /देश /तृतीयपंथीय बनली "आई", गरीब मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च उचलत केलं कन्यादान VIDEO

तृतीयपंथीय बनली "आई", गरीब मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च उचलत केलं कन्यादान VIDEO

तृतीयपंथीयाचा कौतुकास्पद निर्णय

तृतीयपंथीयाचा कौतुकास्पद निर्णय

या लग्नाचा जो व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

  • Local18
  • Last Updated :
  • Panipat, India

पानीपत (हरयाणा), 13 मार्च : मुलीच्या लग्नाची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. येथे एका तृतीयपंथीयाने कन्यादान केले आहे. शहरातील बेबी तृतीयपंथी हिने असे काम की, ते पाहून लोक भावूक झाले. तृतीयपंथी असल्यामुळे ती कधीच आई होऊ शकत नाही, पण तिने एका गरीब मुलीला लहानपणापासूनच वाढवले ​​आणि आता नंतर तिचे लग्न थाटामाटात केले. वधूचे दागिने, वराचे दागिने, वऱ्हाडाचे स्वागत, लग्नातील जेवणाची व्यवस्था या सर्व जबाबदाऱ्या बेबी तृतीयपंथीने सांभाळल्या.

या लग्नाचा जो व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. कारण बेबीने फक्त या मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्चच उचलला नाही तर आईपेक्षाही तिचे कर्तव्य अधिक पार पाडले. जी मुलगी लहानपणापासून तिच्यासोबत राहायची, तिला स्वतःच्या हातांनी वाढवलं आणि आज ती मोठी झाल्यावर तिचं कन्यादानही केलं.

" isDesktop="true" id="848227" >

हे सर्व पाहून मुलीच्या आईचे अश्रू आवरले नाहीत. मुलगी आई बेबीला मिठी मारून खूप रडली. म्हणाली, बेबी तृतीयपंथी यांनी जे केले ते बहुधा कोणी करत नाही. मुलीच्या आईने सांगितले की, आपल्या मुलीचे लग्न इतक्या थाटामाटात होईल, असे कधी वाटले नव्हते. जेव्हा आई या बेबीला मिठी मारून रडू लागली तेव्हा तिने तिचे सांत्वन केले आणि सांगितले की आपली मुलगी सदैव आनंदी राहावी, हीच तिची इच्छा आहे.

डॉक्टर होण्याचं स्वप्न मोडलं गेलं, पण Gold Medal जिकंत तिने दिला यशाचा 'हा' मंत्र VIDEO

दुसरीकडे, आज आई म्हणून सर्व विधी पार पाडणारी तृतीयपंथी बेबी सांगते की, जन्नत लहानपणापासून तिच्यासोबत राहायची. तिला ती आपली मुलगी मानते, त्यानंतर तिने अशा प्रकारे जन्नतचे लग्न लावले.

First published:
top videos

    Tags: Haryana, Local18, Marriage