पाटणा, 21 डिसेंबर : मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे रविवारी भागलपुरमधील गुवारीदीहमधील पुरातत्वकालिन ठिकाणांना भेट देण्यासाठी पोहोचले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानुळे गावकऱ्यांमध्ये खूप असंतोष आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार गुवारीडीह गावात पुरातत्वकालिन अवशेषांची पाहणी करण्यासाठी पाटण्याहून हेलिकॉप्टरने भागलपूर आले होते. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली, ही गर्दी इतकी होती व हेलिकॉप्टर लँड केलेल्या जवळपासच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. नागरिक पिकं पायाखाली तुडवित हेलिपॅड पाहण्यासाठी सैरावैरा धावत होते. रस्ता चांगला नसल्याने हेलिपॅड लांब बनविण्यात आलं ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं हेलिपॅड बनविण्यात आलं होतं, तेथून 3 किमी अंतरावर जयरामपूर उच्च विद्यालय आहे. प्रशासन या शाळेच्या मैदानात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरवू शकला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. जर शाळेच्या मैदात मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टर उतरवलं असतं तर तिथून 5 मिनिटांच्या अंतरावरुन नितीश कुमार गुवारीडीह गावी पोहोचू शकले असते. मात्र 3 किमीचा हा रस्ता जो नितीश कुमार चालून पार करू शकले असतो तो खराब अवस्थेत होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने हेलिपॅड गुवारीडी गावात कामा माता ठिकाणी जवळच असलेल्या शेताता हेलिपॅड उभारल्यात आला. यावरुन विरोधी पक्षाने नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. आरजेडी प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी सांगितलं की, बिहारमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं. पिकं नष्ट करुन मुख्यमंत्र्यांसाठी हॅलिपॅडची उभारणी केली. यावरुन सरकार बिहारमधील शेतकर्यांच्या पिकाला कसे पायदळी तुडवत आहे हे दिसून येते. नितीशकुमार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळायला हवी. बिहार सरकार शेतकरीविरोधी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.'' जनता दल युनायटेडचे प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले की, "शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचा संकल्प स्पष्ट आहे. हेलिपॅडच्या बांधकामामुळे भागलपूरमधील पिकांचे नुकसान होण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना भरपाई दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. या संदर्भात कोणतेही राजकारण करू नये. हा संपूर्ण विषय समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांच्या नुकसानीचे आकलन करून त्वरित अहवाल सादर करावेत जेणेकरून त्यांना भरपाई मिळू शकेल, असा आदेस डीएम यांनी अधिकाऱ्यांना दिला आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Nitish kumar