Home /News /national /

धोका लक्षात घेता तालिबानला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा दलांना मिळणार विशेष प्रशिक्षण; असं असेल नवं मॉड्यूल

धोका लक्षात घेता तालिबानला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा दलांना मिळणार विशेष प्रशिक्षण; असं असेल नवं मॉड्यूल

सध्या सुरक्षा दलांसाठी असलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये तालिबानशी संबंधित कोणतीही माहिती नाही. त्यामुळे सुरक्षा दलांना नवीन पद्धतीने प्रशिक्षण देण्यास आणि त्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल (Training Module) तयार करण्यास सांगण्यात आलंय.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 13 सप्टेंबर : तालिबान आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी दहशतवादविरोधी कारवायांवर तैनात सुरक्षा दलांसाठी आता एक नवीन प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले जाईल. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की केंद्रीय सुरक्षा आस्थापनेने या सुरक्षा दलांना नवीन पद्धतीने प्रशिक्षण देण्यास आणि त्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल (Training Module) तयार करण्यास सांगितले आहे. अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा (Taliban Regains Control of Afghanistan) केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO सध्या सुरक्षा दलांसाठी असलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये तालिबानशी संबंधित कोणतीही माहिती नाही. भारताने काही दिवसांपूर्वी अशी भीती व्यक्त केली होती की तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पश्चिमेकडील पाकिस्तानच्या सीमेवर घुसखोरी आणि दुसरीकडे पूर्वेकडील खुली सीमा या भागात दहशतवाद्यांची घुसखोरी वाढवू शकते. अमेरिकन सुरक्षा दल अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर, केंद्रीय सुरक्षा दलांनी ओळखलं आहे की शेजारच्या भागात नवीन घडामोडी वेगाने घडत आहेत आणि भारतालाही याची जाणीव असणे आवश्यक आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं, की सीमा सुरक्षा दलांचे प्रशिक्षण मोड्यूल जसे बीएसएफ आणि एसएसबी, राज्य पोलीस युनिट आणि सीआरपीएफ तसेच जम्मू पोलीस कर्मचारी जे आता दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत त्यांच्या प्रशिक्षणात आता सीमा व्यवस्थापनाच्या बदललेल्या अटींचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालिबानबद्दल माहिती समाविष्ट आहे. Indian Navy Recruitment: भारतीय नौसेनेत इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती ते म्हणाले की खुल्या स्त्रोतांकडून मिळालेली माहिती गुप्तचर पद्धतीने प्राप्त माहितीशी जोडली जात आहे. अधिकारी म्हणाले की आमचे लक्ष गेल्या 20 वर्षांच्या घडामोडींवर आहे, ज्या 9/11 नंतर घडल्या. ते म्हणाले की, तयार करण्यात येत असलेल्या नवीन मॉड्यूलमध्ये तालिबानचे नेतृत्व, पद्धती इत्यादींवर नवीन माहिती अपडेट केली जात आहे. ते म्हणाले की, चेकपोस्टवर उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना तालिबान आणि त्याच्या कारवायांशी संबंधित इतिहास आणि माहिती जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Indian army, Taliban

    पुढील बातम्या