धक्का लागून ट्रॅकवर पडली महिला, मागून येत होती मेट्रो... पुढे काय घडलं पाहा VIDEO

आणि मेट्रो महिलेच्याजवळ येऊन थांबली, काळजाचा ठोका चुकवणारी घटना CCTVमध्ये कैद.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 11:54 AM IST

धक्का लागून ट्रॅकवर पडली महिला, मागून येत होती मेट्रो... पुढे काय घडलं पाहा VIDEO

अर्जेंटीना, 20 ऑक्टोबर: अर्जेंटीनाची राजधान ब्यूनस आयर्स मेट्रो रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी धक्कादायक घटना घडली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणेच प्रवाशांच्या डोळ्यादेखत प्रकार घडला. ब्यूनस आयर्स इथे मेट्रो स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीचा जोरात धक्का लागल्यानं महिला ट्रॅकवर पडली. आणि मागून मेट्रो येत होती. मात्र काही दुर्घटना घडण्याआधीच मेट्रो चालकानं मेट्रो काही अंतरावर थांबवली. महिला आणि मेट्रोमध्ये फक्त काही सेंटीमीटरचं अंतर होतं. मेट्रो चालक आणि काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रॉटर्स या वृत्त संस्थेनं ट्विटरद्वारे याचं वृत्त दिलं आहे.

Loading...

नेमकं काय घडलं होतं?

ब्युनस आयर्स या मेट्रो स्थानकात शनिवारी रात्री प्रवासी मेट्रोची वाट पाहात होते. त्यावेळी एका तरुणाला उभ्या उभ्याच डुलकी लागली आणि तो खाली पडला. त्याचा धक्का महिलेला इतक्या जोरात लागला की महिला थेट ट्रॅकवर पडली. ट्रॅकवर जोरात आपटल्यामुळे महिलेच्या डोक्याला मार लागला आणि बेशुद्ध झाली. तेवढ्यात मागून मेट्रो येत असल्याचं पाहून प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. महिलेला वाचवण्यासाठी भीतीनं सुरुवातीला कोणीच ट्रॅकवर उतरलं नाही मात्र प्रवाशांनी हात दाखवण्यास सुरूवात केली. नंतर काही धाडसी नागरिकांनी खाली उतरुन महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मेट्रो चालकाला काहीतरी गडबड सुरु असल्याचं लक्षात येताच त्याने मेट्रो थांवली. मेट्रो आणि महिलेमध्ये काही सेकंदाचं काही सेंटीमिटरचं अंतर होतं. मात्र मेट्रो थांबल्याचं पाहताच प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला. जखमी महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...