ट्रायनं चॅनल निवडण्याची मुभा 31 मार्चपर्यंत वाढवली, ग्राहकांना मोठा दिलासा

ट्रायनं चॅनल निवडण्याची मुभा 31 मार्चपर्यंत वाढवली, ग्राहकांना मोठा दिलासा

ट्रायच्या नव्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या आवडीचे टीव्ही चॅनल निवडले नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण आवडीचे चॅनल निवडण्यासाठी ट्रायनं 31 मार्चची नवीन डेडलाईन दिलीय.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : ट्रायच्या नव्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या आवडीचे टीव्ही चॅनल निवडले नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण आवडीचे चॅनल निवडण्यासाठी ट्रायनं 31 मार्चची नवीन डेडलाईन दिलीय. त्यामुळं प्रेक्षकांना जवळपास दीड महिन्यांचा जादा अवधी मिळालाय.

याआधी ट्रायनं 31 जानेवारीची डेडलाईन दिली होती. मात्र अनेक जणांनी नव्या नियमांनुसार टीव्ही चॅनलचे पॅक निवडलेले नाहीत. तसंच चॅनल पॅक कसा निवडायचा याबाबत अनेकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळं 31 मार्चच्या नव्या डेडलाईनमुळं मिळालेला दीड महिन्याच्या अवधीत तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन टीव्ही चॅनल निवडावे लागणार आहेत.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या आदेशानुसार प्रेक्षक दर महिन्याला 153 रुपये ( जीएसटी धरून ) खर्च करून 100 चॅनेल्स पाहू शकतात.

ग्राहकांच्या मोबाईलवर sms पाठवून ही माहिती दिली जातेय. TRAIनं दिलेल्या 2 टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीवरूनही तुम्हाला माहिती मिळू शकते.

153 रुपयांत काय काय मिळणार?

153 रुपयात 100 चॅनेल्सच्या स्लाॅटसाठी नेटवर्क कपॅसिटी फी द्यावी लागेल. यात जर तुम्ही फ्री टू एअर चॅनेल निवडलेत तर अतिरिक्त चार्ज पडणार नाही. पेड चॅनेलसाठी तुम्हाला त्या बुकेप्रमाणे पैसे द्यावे लागतील.

इथे करा फोन

ग्राहक 011-23237922 (एके भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) यानंबरवर फोन करू शकतात.  advbcs-2@trai.gov.in किंवा arvind@gove यावर ईमेल करून माहिती घेऊ शकता.

100हून जास्त चॅनेल्ससाठी इतके पैसे द्यावे लागणार

जर तुम्हाला 100हून जास्त चॅनेल पाहायचे असतील ( असे ग्राहक 10 ते 15 टक्के आहेत ) तर पुढच्या 25 चॅनेल्सना 20 रुपये द्यावे लागतील. एका चॅनेल्ससाठी कमीत कमी शून्य ते जास्तीत जास्त 19 रुपये खर्च करावे लागतील. इतर चॅनेल्स वेगवेगळ्या बुकेच्या रूपात तुम्हाला निवडता येतील.

नव्या सिस्टिमची सुरुवात अगोदर 29 डिसेंबर 2018पासून होणार होती, पण त्यानंतर 1 फेब्रुवारी 2019पर्यंत ती मुदत वाढवली. आता ती 31 मार्च केलीय.

त्यामुळे आता ग्राहकाला कुठलाही केबल आॅपरेटर फसवू शकत नाही. मनमानीही करू शकत नाही. फक्त ग्राहकांनी काळजीपूर्वक चॅनेलची निवड करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 07:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading