आता तुमचा टीव्ही नाही होणार बंद; चॅनेल निवडीसाठी एक महिना मुदत

आता तुमचा टीव्ही नाही होणार बंद; चॅनेल निवडीसाठी एक महिना मुदत

टीव्हीवरचं आपल्या पसंतीची चॅनेल्स निवडण्यासाठी TRAI ने31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हवं त्याच चॅनेलचे पैसे देण्याचा नियम तूर्तास एक महिना पुढे गेला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : टीव्हीवरचं आपल्या पसंतीची चॅनेल्स निवडण्यासाठी TRAI ने(दूरसंचार नियामक प्राधिकरण)31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  आधी ही मुदत 29 डिसेंबर होती. केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांनीही निषेधाचं हत्यार उगारल्यामुळे टीव्ही बंद होतो की काय अशी भीती सर्वसामान्य ग्राहकांना होती. मात्र आता तूर्तास तरी हे संकट टळलं आहे.

तुम्हाला हवं त्या चॅनेलचेच पैसे भरावे, पॅकेजमध्ये येणाऱ्या अनावश्यक चॅनेलचा भार ग्राहकांनी वाहू नये, असा ट्रायच्या नवीन नियमांचा उद्देश होता. पण त्यामुळे आता टीव्ही बंद होतो की काय अशी भीती निर्माण झाली होती.

या नव्या नियमांबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळ आहे आणि इतक्या तातडीने ते लागू करू नयेत म्हणून डीटीएच ऑपरेटर आणि ब्रॉडकास्टर्सनी एकत्र येऊन निषेध केला होता. संध्याकाळी 7 ते 10 या वेळात टीव्ही प्रक्षेपण बंद ठेऊ , असा इशाराही देण्यात आला होता. पण आता ट्रायने मुदतवाढ दिली असल्याने टीव्ही प्रक्षेपण बंद होणार नाही.

फ्री चॅनेल्सलाही लागणार शुल्क

इतके दिवस केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्या पॅकेजबरोबर फ्री टू एअर चॅनेल्स देत होती. त्यामुळे या चॅनेल्ससाठी वेगळं काही शुल्क भरावं लागत नव्हतं. अशी जवळपास 100 चॅनेल्स आतापर्यंत फुकट बघता येत होती. पण आता पॅकेज सिस्टीम बंद होणार आहे आणि तुम्हाला हवं तेवढ्याच चॅनेलचे पैसे द्यायचे आहेत. यात आता फ्री टू एअर चॅनेल्स दाखवण्याचं किमान शुल्क मात्र ग्राहकांना भरावं लागणार आहे. या चॅनेल्ससाठी आता 130 रुपये भरावे लागू शकतात.

VIDEO : 'एक दुजे के लिये' म्हणत विष पिऊन फिरत होते प्रेमी युगुल, व्हिडिओ व्हायरल


<iframe class="video-iframe-bg-color" onload="resizeIframe(this)" id="story-327053" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzI3MDUz/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 04:16 PM IST

ताज्या बातम्या