चंदीगड, 12 मे : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) कहर वाढत असून यामध्ये वैद्यकीय सेवा देणारे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. नर्सेस तर स्वत:च्या कुटुंबापासून अगदी लहान लेकरांपासून दूर रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची सेवा करीत आहे. आज जागतिक परिचारिका दिनी त्यांच्या कामाचे कौतुक करण्याच्या दिवशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
चंदीगडमधील पीजीआयमधील एका नर्सने आत्महत्या केली आहे. नर्सने विषारी इंजेक्शन लावून आत्महत्या केली. ओपीडीमध्ये तैनात असलेल्या या नर्सिंग ऑफिसरने आपल्यासोबत काम करणाऱ्या चार वरिष्ठ ड्यूटी स्टाम कर्मचाऱ्यांना वैतागून इतकं मोठं पाऊल उचललं आहे. या नर्सचं नाव दविंदर कौर असं आहे.
दविंदर कौर यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली. ज्यामध्ये दविंदरने पीजीआयच्या चार महिला कर्मचारी आत्महत्येमागील कारण असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दविंदर कौर हिचे पती यांच्या जबाबावरुन त्या 4 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दविंदर कौर हिचा पती अमित यांने सांगितले की, दविंदर पूर्वी ओपीडीमध्ये तैनात होती. मात्र काही दिवसांनी तिला स्त्रीरोग विभागात शिफ्ट करण्यात आलं. दविंदर कौरने अधिकाऱ्यांना सांगितले की वर्कलोड जास्त असल्याने ती येथे ड्यूटी करू शकत नाही, तिला पुन्हा ओपीडीत शिफ्ट करावं. मात्र अधिकाऱ्यांनी तिचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर दविंदर दीड महिन्याच्या सुट्टीवर गेली. तिने 22 एप्रिललाही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यातून ती बचावली. दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर ती कार्यालयात रुजू झाली. त्यानंतर तिला पुन्हा ओपीडीत शिफ्ट करण्यात आलं. मात्र वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. संबंधित -‘लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेला आत्मघातकी ठरेल’; आनंद महिंद्रांनीही दिला इशारा
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.