रविवारपासून लागू होणार ट्रॅफिकचे हे नवे 19 नियम, लायसन्स नसेल तर बसेल 25000 चा दंड

रविवारपासून लागू होणार ट्रॅफिकचे हे नवे 19 नियम, लायसन्स नसेल तर बसेल 25000 चा दंड

सरकारने वाहतूक अधिनियम बदलाचं विधेयक मंजूर केल्यानंतर आता नवे नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : सरकारने वाहतूक अधिनियम बदलाचं विधेयक मंजूर केल्यानंतर आता नवे नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हा कायदाबदल आहे. पात्रता नसतानाही गाडी चालवणाऱ्यांना इतके दिवस 500 रुपये दंड होत होता. तोच आता 10 हजार रुपये झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात होता. तोही आता 10000 रुपयांवर गेला आहे. लायसन्स बरोबर नसेल तर 500 ऐवजी आता 5000 रुपये दंड द्यावा लागेल. त्यामुळे गाडी चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा - 1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांचे हे 7 नियम, जाणून घ्या सर्व माहिती

वाहतुकीचे नियम बदलून नवे नियम लागू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. वाहतुकीचे हे नियम मोडले तर जबर दंड होऊ शकतो. ड्रायव्हिंगचा परवाना हवा असेल तर त्यासाठीही काटेकोर निकष लावण्यात येणार आहेत. जर कुणी अल्पवयीन मुलाने किंवा मुलीने गाडी चालवताना अपघात घडला तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना 3 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होईल. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल.

हे वाचा -  पाकिस्तानात हाहाकार! इथले सोन्याचे भाव पाहून तुमचे डोळे होतील पांढरे

नव्या नियमांनुसार, आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही किंवा अपात्र असाताना गाडी चालवली तर 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. सीट बेल्ट लावला नाही तरीही मोठा दंड होईल. भरधाव वेगाने गाडी चालवली तर एक हजार रुपयापासून 2 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

हे आहेत नवे नियम

1. विनातिकीट प्रवास केला तर 500 रु. दंड पडेल.

2. अधिकाऱ्यांचा आदेश मानला नाही तर 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

3. लायसन्स नसताना गाडी चालवली तर 5 हजार रुपयांचा दंड

4. अपात्र होऊन वाहन चालवल्यास 10 हजार रु. दंड

5. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांना 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं तर 5 हजार रुपयांचा दंड

7. दारू पिऊन गाडी चालवली तर 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

8. स्पीडिंग किंवा रेसिंग केलं तर 5 हजार रुपयांचा दंड आहे.

9. परवाना नसताना वाहन चालवलं तर 10 हजार रुपयांचा दंड

10. लायसन्सचे नियम तोडले तर 25 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे.

हे वाचा - RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

11. वाहनात जास्त सामान भरलं तर 2 हजार रुपयांहून जास्त दंडाची तरतूद आहे.

12. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील तर एका पॅसेंडरला एक हजार रुपये असा दंड पडेल.

13. सीटबेल्ट लावला नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आहे.

14. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्या तर 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.

15. हेल्मेट घातलं नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होण्याची शिक्षा

16. अँब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

हे वाचा - असे व्हा श्रीमंत : रोज 50 रु. वाचवा आणि 10 लाख रुपये मिळवा

17. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवलं तर 2 हजार रुपयांचा दंड पडेल.

18. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात झाला तर त्यांच्या पालकांना दोषी ठरवलं जाईल. वाहनाची नोंदणीही रद्द होईल.

19. अधिकाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.

==================================================================

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 29, 2019, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading