'पावती फाडलीत तर आत्महत्या करेन'; भररस्त्यात तरुणीचा धिंगाणा

वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर दंड चुकवण्यासाठी तरुणीनं दिली आत्महत्येची धमकी, VIDEO व्हायरल

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 03:17 PM IST

'पावती फाडलीत तर आत्महत्या करेन'; भररस्त्यात तरुणीचा धिंगाणा

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: वाहतुकीचे नवे नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना जास्त दंड भरावा लागत आहे. सुरक्षित वाहतुक व्यवस्था राखण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. बऱ्याचदा वाहतूक पोलिसांनी दबाव टाकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहयला मिळतात. मात्र चक्क वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर तरुणी दंड न भरण्यासाठी वाहतूक पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना दिल्लीतील कश्मीरी गेटजवळ घडली.

तरुणीच्या गाडीची नंबर प्लेट तुटलेली, हेल्मेट नीट घातलं नाही आणि गाडी वेगात असल्यानं तरुणीला वाहतूक पोलिसांनी थांबवून नियमाप्रमाणे दंड आकारला मात्र तरुणीने भररस्त्यात कांगावा करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

'कोणत्याही कारणासाठी तुम्ही मला दंड आकारलात तर मी इथे आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल', अशी थेट धमकी तरुणीने पोलिसांना दिली.

पोलिसांनी तरुणीकडे गाडीची कागदपत्र मागितल्यानंतर तरुणीने उलटसुलट उत्तरं देत टाळाटाळ केली आणि भर रस्त्यात कांगावा केला. त्यानंतर रडून गोंधळ घातला मात्र पोलीस नियमानुसार पावती फाडत असल्याचं दिसताच दंडापासून वाचण्यासाठी तरुणीनं आत्महत्येची धमकी दिली. कोणत्याच नाटकाला पोलीस बळी पडत नसल्यानं लक्षात येताच तरुणीनं आपली चूक कबूल केली. त्यानंतर कोणताही दंड न आकारता वाहतूक पोलिसांनी तरुणीला सोडून दिलं आहे.

पाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...