हेल्मेटमुळे वाचला तरुणाचा जीव; भीषण अपघाताचा CCTV VIDEO व्हायरल

रस्त्यावर झालेल्या अपघातामधून वाचला तरुणाचा जीव, हेल्मेटमुळे मोठा अनर्थ टळला

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 03:20 PM IST

हेल्मेटमुळे वाचला तरुणाचा जीव; भीषण अपघाताचा CCTV VIDEO व्हायरल

मुंबई, 15 सप्टेंबर: हेल्मेट घालणं आपल्याला बऱ्याचवेळी कमीपणाचं वाटतं किंवा हेल्मेट न घालण्यासाठी अनेक कारणं दिली जातात. हेल्मेट सक्तीनंतर अनेक ठिकाणी तरुणांनी आंदोलनं केली. मात्र दुचाकी चालवताना हेल्मेट वापल्यामुळे आपलाच जीव सुरक्षित रहातो. असं वारंवार वाहतूक पोलीस आणि प्रशासन आवाहन करूनही त्याचं पालन होत नाही. सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हेल्मेट वापरल्यामुळे तरुणाचा थोडक्यात जीव वाचला आहे. हे हेल्मेट तरुणाच्या डोक्यावर नसतं तर मोठा अनर्थ घडला असता.

Loading...

मोटार वाहन कायद्यानुसार आता 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना जास्त दंड भरावा लागणार आहे. सुरक्षित वाहतुक व्यवस्था राखण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार हेल्मेट घातलं नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होण्याची शिक्षा होऊ शकते. 2018 वर्षात हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

अबब! पावती फाडण्याचा रेकॉर्ड, ट्रक चालकाविरोधात 6 लाखांची दंडात्मक कारवाई

देशभरात 1 सप्टेंबर 2019पासून नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. यादरम्यानच, ओडिशामध्ये एका ट्रक चालकाविरोधात सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ओडिशामध्ये शैलेश शंकर लाल गुप्ता या ट्रक चालकाविरोधात वाहतूक परिवहन विभागानं तब्बल 6 लाख 53 हजार 100 रुपयांची पावती फाडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक गुप्तानं गेल्या पाच वर्षांपासून वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. एकूण सात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुप्ताविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच गेल्या पाच वर्षांपासून त्यानं टॅक्सदेखील भरलेला नाही. ध्वनी, वायू प्रदूषण, विना परवाना गाडी चालवणं यांसह सामान्य नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड गुप्ताला ठोठावण्यात आला आहे.

भारत-अमेरिकेच्या सैनिकांनी एकत्र गायलं आसाम रेजिमेंटचं मार्चिंग गाणं, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...