कार चालवणाऱ्या 10 वर्षीय मुलाची फाडली पावती, VIDEO VIRAl

कार चालवणाऱ्या 10 वर्षीय मुलाची फाडली पावती, VIDEO VIRAl

धक्कादायक! वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत थेट चारचाकी गाडीचं स्टेअरिंग पालकांनी दिलं 10 वर्षांच्या मुलाच्या हातात

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: 10 वर्षांचा मुलगा गाडी चालवताा कधी पाहिलाय का? पण सोशल मीडियावर असाच एक 10 वर्षांचा मुलगा चक्क कार चालवतानाचा एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 8 डिसेंबर रोजी हैदराबाद इथे आऊटर रिंग रस्त्यावर ही गाडी चालवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. 18 वर्ष पूर्ण आणि विना परवाना गाडी चालवणं वाहतुकीच्या नियमाबाहेर असताना हा चिमुकला चक्क बिनधास्त गाडी चालवताना दिसत आहे. या गाडीत आणखी काही जण बसल्याचं दिसत आहे. कदाचित त्याचे आई-वडील असू शकतात असा कयास व्यक्त केला जात आहे. 16 सेकंदाची ही व्हिडिओ क्लीप ट्विटरवर टायगर निलेश नावाच्या व्यक्तीच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर ही पोस्ट झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हिडिओमध्ये AP 28 BL 6979 नंबर प्लेट असलेली सिल्वर रंगाची ऑल्टो कार 10 वर्षांचा मुलगा अगदी बिनधास्तपणे चालवत आहे आणि त्याच्या शेजारी मोठी माणसं बसले आहेत. वाहतुकीचे नियम माहीत असूनही त्याची पायमल्ली करत अशा प्रकारे मुलाच्या हातात गाडीचं स्टेअरिंग देणं हा कायद्यानं गुन्हा आहे.

वाचा-

पालकांनी उचलेलं हे पाऊल चुकीचं आहे. इतक्या लहान मुलाच्या हातात स्टेअरिंग देणं म्हणजे पालकांनी जाणीवपूर्व केलेली चूक असल्याचं प्रत्यक्षदर्शी नीलेश यांनी म्हटलं आहे. त्यांनी हैदराबाद इथे 8 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं आहे. आई-वडिलांच्या उपस्थितीत मुलाच्या हातात स्टेअरिंग देऊन कसा जीव धोक्यात घातला जातो त्याचं हे उदाहरण म्हणायला हवं. नीलेश यांनी या मुलाच्या आई-वडिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ड्रिंग अॅण्ड ड्राइव्ह हा एका गुन्हा आहे आणि अशा प्रकरणांमध्ये अनेकवेळा चालकाला कारावासाची शिक्षा दिली जाते. मात्र आई-वडिलांनी केलेल्या अशा चुकीला मात्र शिक्षा दिली जात नाही. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तनुसार ही कार कायम वाहतुकीचे नियम मोडत असते. 2015 रोजीही या कारच्या मालकांना 4500 रुपयांचा दंड भरावा लागला होता.

वाचा-

हा व्हिडिओ वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर या कारविरोधात ई-चलन काढण्यात आलं आहे. कार मालकाला वाहतुकीचे नियम मोडल्यानं दंड तर भरावा लागेलच मात्र पालकांवर काय कारवाई केली जाते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 17, 2019, 7:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading