मराठी बातम्या /बातम्या /देश /

Traffic Police Rule: वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी; या नियमाकडे दुर्लक्ष कराल तर भरावा लागेल दंड

Traffic Police Rule: वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी; या नियमाकडे दुर्लक्ष कराल तर भरावा लागेल दंड

कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांसाठी ही लागू होणार हा नियम, आताच माहित करुन घ्या नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कारमधील मागच्या सीटवर बसणाऱ्यांनाही सीटबेल्ट लावणं महत्त्वाचं आहे. त्यांनी या नियमाचं पालन केलं नाही तर कार चालकाला आता दंड भरावा लागणार आहे.

तुम्ही मागे बसताना जर सीटबेल्ट लावला नाही तर तुम्हालाही दंड भरावा लागू शकतो. दिल्लीतील वाहतूक पोलिसांनी हा नियम कठोरपणे पाळायला सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये आता वाहतूक पोलिसांना सीट बेल्ट न लावणाऱ्यांना दंड आकारला आहे.

नव्या नियमानुसार मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जात आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी बुधवारी यासाठी विशेष मोहीम सुरू केली.

पहिल्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 17 जणांना हा दंड लावण्यात आला. मोटार वाहन कायद्याच्या कलम 194B अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या नियमाचे पालन न केल्याने 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्ली पोलिसांनी सीट बेल्ट लावण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं होतं. याशिवाय स्पीड ड्राईव्ह करू नये असंही आवाहन केलं होतं. आतापर्यंत यामुळे १९०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. राजधानी दिल्लीमध्ये झालं आता महाराष्ट्रात कधी सुरू होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे.

First published:

Tags: Delhi, Traffic, Traffic Rules