नादखुळा! दंड घेतल्यामुळे फोडली बाईक, नंतर गळा काढून रडला; VIDEO व्हायरल

नादखुळा! दंड घेतल्यामुळे फोडली बाईक, नंतर गळा काढून रडला; VIDEO व्हायरल

तरुण विना हेल्मेट गाडी चालवत असल्यामुळे पोलिसांनी त्याच्य़ाकडून दंड घेतला. त्याचा तरुणाला राग आला आणि त्याने स्वत:ची बाईक रस्त्यावर आपटली.

  • Share this:

मेरठ (उत्तर प्रदेश)01 डिसेंबर : विना हेल्मेट गाडी चालवल्यामुळे एका तरुणाला दंड भरावा लागला पण त्यानंतर जे काही झालं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पोलिसांनी दंड ठोठावल्यामुळे तरुणाला इतका राग आला की त्याने भर रस्त्यात स्वत:चीच दुचाकी आपटली. काही लोकांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या दुचाकीला आपटताना दिसत आहे. बाईक आपटल्यानंतर त्याच्या चूक लक्षात आली आणि तो मोठ्याने रडू लागला.

लोकांनी शूट केला व्हिडिओ

तरुण विना हेल्मेट गाडी चालवत असल्यामुळे पोलिसांनी त्याच्य़ाकडून दंड घेतला. त्याचा तरुणाला राग आला आणि त्याने स्वत:ची बाईक रस्त्यावर आपटली, यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचं ऐकलं नाही. पण काही वेळाने तरुणाच्या लक्षात आलं की, त्याने स्वत:चीच बाईक फोडली. त्यानंतर मात्र त्य़ाने मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराचा परिसरात उभ्या असलेल्या लोकांनी व्हिडिओ शूट केला.

लोकांनी सोशल मीडियावर दिले सल्ले

ट्विटरवर इतर काही लोक म्हणाले की, हे दुर्दैवी आहे, कदाचित दंड त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल. तथापि वाहतुकीचे नियम पाळणे देखील आवश्यक आहे. जास्त दंड लावल्यास फायदा होणार नाही. एका दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटले की आर्थिक मंदी हा एक आजार आहे, हे त्याचे उदाहरण आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं की, मध्यमवर्गीय लोकांवर खूप दंड पडतो. एका वापरकर्त्याने सांगितले की, मूळ समस्या हेल्मेटची आहे. पीडितेने हेल्मेट घातले नव्हते आणि आता तो ओरडत आहे, हे चुकीचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2019 07:52 PM IST

ताज्या बातम्या