तरुणाचं ट्राफिक पोलिसांना आव्हान, आधी माझी गाडी चालवा नंतर पावती फाडा!

तरुणाचं ट्राफिक पोलिसांना आव्हान, आधी माझी गाडी चालवा नंतर पावती फाडा!

ट्राफिक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसल्यानंतर एका कारचालकानं माझी गाडी चालवून दाखवलीत तर मी पावती फाडतो असं आव्हान ट्विटरवरून दिलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 15 सप्टेंबर : देशात ट्राफिक पोलिसांचा धसका आता वाहन धारकांनी घेतला आहे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची रक्कम भरावी लागत असल्यानं अनेक वाहन धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मोठ्या रकमेचे दंड झाल्याचंही समोर आलं आहे. काही ठिकाणी तर पोलिसांनी दमदाटी केल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशातच आता ट्राफिक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा फटका तरुणाला बसल्याचं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील ट्राफिक पोलिसांनी मारुती बलेनो कारने मर्यादेपेक्षा जास्त वेगानं वाहन चालवल्याबद्दल पावती फाडली. पण यावेळी गाडीचा नंबर टाकण्यात चूक झाली. त्यांनी बलेनोऐवजी मारुती आल्टोच्या मालकाला पावती पाठवली. त्यानंतर मारुती आल्टोच्या मालकाने ट्विटरवरून ट्राफीक पोलीसांना त्यांची चूक नजरेस आणून दिली.

दिल्लीत राहणाऱ्या कारचालकाने ट्विटरवरून सांगितलं की, त्याची गाडी 9 वर्ष जुनी आहे. जर उत्तर प्रदेशचे पोलीस ही गाडी 144 किलोमीटर प्रतितास वेगाने चालवून दाखवणार असतील तर मी 2 हजार रुपयांची पावती फाडतो. या ट्विटनंतर ट्राफिक पोलिसांची फिरकीही घेतली गेली. तरुणाने उत्तर प्रदेश पोलिसांना त्यानं सांगितलं की, मी मारुती आल्टो चालवतो. पोलिसांकडून चुकीचा नंबर टाकला गेला आहे.

कारचालकाने केलेल्या ट्विटवर अनेकांनी मजेशीर रिप्लाय दिले आहेत. तर काहींनी पोलिसांकडून नंबर टाकण्यात चूक झाली असेल असं सांगितलं आहे. यातील एका कमेंटवर रिप्लाय देताना कार चालकानं म्हटलं आहे की, नंबर चुकीचा लिहला आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे. उत्तर प्रदेश आहे... इथं काहीही चालतं.

एक सप्टेंबरपासून नवा मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नव्या कायद्यानुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. काही राज्य सरकारकडून याला विरोधही करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्यातरी अशी दंडात्मक कारवाई होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

पेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO

First published: September 15, 2019, 12:24 PM IST
Tags: traffic

ताज्या बातम्या