पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दिलं सरप्राइज, कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दिलं सरप्राइज, कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या अचानक दिलेल्या भेटीचे (Gurudwara Rakab Ganj) काही फोटो शेअर केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.

याठिकाणी वाहतूक तर थांबवण्यात आलं नव्हतच पण सामान्य दिवसाप्रमाणेच व्यवस्था होती. सुरक्षा व्यवस्था देखील नेहमीप्रमाणेच होती. यावेळी कोणता विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुरु तेगबहादुर यांच्या त्यागाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांनी यावेळी असं लिहिलं आहे की, 'आज सकाळी मी ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब याठिकाणी प्रार्थना केली, जिथे श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या पुण्य देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मला अत्यंत धन्यता वाटली. जगातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच, श्री गुरु तेगबहादुर जी यांच्या दयाळूपणाने मला खूप प्रेरणा मिळाली आहे.'

आणखी एका ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं आहे की, 'ही गुरु साहिब यांची विशेष कृपा आहे की, आमच्या सरकारच्या कार्यकाळात श्री गुरु तेग बहादुर जी यांचे 400 वे प्रकाश पर्वाच क्षण साजरा करू.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या अचानक दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदी दिवसानिमित्त श्री गुरू तेग बहादुर जी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

श्री गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन धैर्य आणि करुणेचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटरवरील संदेशामध्ये म्हटले आहे. 'शहीदी दिवसानिमित्त महान श्री गुरू तेग बहादुर जी यांना नमन करत न्याय्य आणि समावेशक समाजाच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे स्मरण करतो',  असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

First published: December 20, 2020, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading