मुंबई, 30 नोव्हेंबर : वाहन निर्मिती क्षेत्रात नावाजलेले दिग्गज आणि टोयोटा या नावाला भारतात ओळख निर्माण करून देणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.
टोयोटा इंडियाने याबद्दल एक प्रसिद्ध पत्रक जारी केले असून विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर 2022 ला टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्हाइस चेयरमन विक्रम एस किर्लोस्कर यांचं दु:खद निधन झालं आहे.
Toyota Kirloskar Motor Vice Chairman Vikram S Kirloskar has died due to a heart attack, the automaker says. He was 64.
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2022
या दुखाच्या प्रसंगात आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबियासोबत असून त्यांच्या आत्मास शांती लाभो, अशी भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. आज 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हेब्बल स्मशानभूमी बंगळुरू इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गितांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर आहे.
(कायम प्रेरणा देणारे आनंद महिंद्रा झाले निराश; मोबाईलबाबत एक कार्टून ठरलं कारण)
विक्रम किर्लोस्कर यांनी मँसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी) से मॅकेनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI अशा अनेक महत्वाच्या पदाचा पदभार सांभाळला. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समुहाच्या चौथ्या पीढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष होते.
(कारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का? काय सांगतो नियम)
तसंच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष सुद्धा होते. अलीकडेच पाच दिवसांपूर्वी विक्रम किर्लोस्कर हे 25 नोव्हेंबर 2022 ला मुंबईत टोयोटा इनोव्हा हाईक्रॉस या नव्या कारच्या लाँचिंग सोहळ्याला हजर होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.