Home /News /national /

धक्कादायक: विषारी दारु प्रकरणातल्या मृतांची संख्या गेली 38 वर

धक्कादायक: विषारी दारु प्रकरणातल्या मृतांची संख्या गेली 38 वर

या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह 8 जणांना अटक केली आहे. ती महिलाच बेकायदेशीरपणे दारुचे गुत्ते चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    अमृतसर 31 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतांनाच पंजाब आणखी एका घटनेने हादरुन गेलं आहे. विषारी दारु पिल्यामुळे राज्यात तब्बल 38 जणांचा मृत्यू झालाय. अमृतसर (Amritsar) शहर आणि तरनतारन (Tarantarn) या भागात हे मृत्यू झाले आहेत. आधी मृतांचा आकडा हा 19 होता. मृतांमध्ये सर्व ग्रामीण भागात राहणारे लोक असून हातावर पोट असणारे मजूर आहेत. प्रकरण गंभीर असल्याने पंजाब सरकारने घटनेच्या चौकशीसाठी SIT नेमण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरच्या साथीमुळे मृत्यूसंख्या वाढत असतांनाच दारुचं प्रकरण उद्भवल्याने सरकारने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये हे मृत्यू झाल्याची माहिती पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. स्वस्त आणि लगेच मिळत असल्याने या सर्वांनी ही दारु विकत घेतली होती. ही दारु बेकायदेशीरपणे तयार होत होती. त्यामुळे बळींची संख्या 38वर गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनेकांवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु होते. मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून पोलिसांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Coronavirus:देशातल्या फक्त 4 शहरांत स्थिती गंभीर; राज्यातल्या 2 शहरांबद्दल चिंता या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह 8 जणांना अटक केली आहे. ती महिलाच बेकायदेशीरपणे दारुचे गुत्ते चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे आता सरकारने अवैध दारु दुकानांवर आपली नजर वळवली असून कारवाईला सुरुवातही केली आहे. या दोनही जिल्ह्यांमध्ये धाडी टाकण्यात येत असून अनेक दुकांनाना सीलही करण्यात आलं आहे. कोरोना रुग्णांसाठी Good News, फक्त 0.28 टक्के पेशंटलाच व्हेंटिलेटर्सची गरज पंजाबमध्ये ड्रग्ज आणि दारुचं प्रमाण खूपच जास्त आहे. पंजाबमधल्या युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त असून हा राज्यातला एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या घटनेमुळे त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. सुपीक जमीन आणि त्यामुळे येत असलेला बक्कळ पैसा. विदेशात असलेले नातेवाईक पाठवत असलेले पैसे, पाकिस्तानातून होत असलेला अंमली पदार्थांचा पुरवढा अशा अनेक गोष्टींमुळे पंजाबमध्ये व्यसनाधिनतेचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात असल्याची माहिती पुढे आली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या