Home /News /national /

कोरोनाचा कहर असतांनाच विषारी दारुमुळे 19 जणांचा मृत्यू, महिला निघाली गुत्तेदार

कोरोनाचा कहर असतांनाच विषारी दारुमुळे 19 जणांचा मृत्यू, महिला निघाली गुत्तेदार

सरकारने घटनेच्या चौकशीसाठी SIT नेमण्याची घोषणा केली आहे. तर दारुंच्या दुकानांवर धाडी टाकण्यात येत आहेत.

    अमृतसर 31 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर (Corona) सुरु असतांनाच पंजाब(Punjab) आणखी एका घटनेने हादरुन गेलं आहे. विषारी दारु(Toxic liquor) पिल्यामुळे राज्यात 19 जणांचा मृत्यू झालाय. अमृतसर (Amritsar) शहर आणि तरनतारन (Tarantarn) या भागात हे मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये सर्व ग्रामीण भागात राहणारे लोक असून हातावर पोट असणारे आहेत. प्रकरण गंभीर असल्याने पंजाब सरकारने घटनेच्या चौकशीसाठी SIT नेमण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरच्या साथीमुळे मृत्यूसंख्या वाढत असतांनाच दारुचं प्रकरण उद्भवल्याने सरकारने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये हे मृत्यू झाल्याची माहिती पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. स्वस्त आणि लगेच मिळत असल्याने या सर्वांनी ही दारु विकत घेतली होती. ही दारु बेकायदेशीरपणे तयार होत होती. त्यामुळे 19 लोकांचा बळी गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून पोलिसांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ती महिलाच बेकायदेशीरपणे दारुचे गुत्ते चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे आता सरकारने अवैध दारु दुकानांवर आपली नजर वळवली असून कारवाईला सुरुवातही केली आहे. या दोनही जिल्ह्यांमध्ये धाडी टाकण्यात येत असून अनेक दुकांनाना सीलही करण्यात आलं आहे. पंजाबमध्ये ड्रग्ज आणि दारुचं प्रमाण खूपच जास्त आहे. पंजाबमधल्या युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त असून हा राज्यातला एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या घटनेमुळे त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. सुपीक जमीन आणि त्यामुळे येत असलेला बक्कळ पैसा. फोनवर बोलत गाडी चालवत असा तर सावधान, खिशाला बसेल मोठी कात्री विदेशात असलेले नातेवाईक पाठवत असलेले पैसे, पाकिस्तानातून होत असलेला अंमली पदार्थांचा पुरवढा अशा अनेक गोष्टींमुळे पंजाबमध्ये व्यसनाधिनतेचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात असल्याची माहिती पुढे आली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Punjab news

    पुढील बातम्या