गोदावरी नदीत पर्यटकांची बोट बुडाली; 13 मृतदेह सापडले, 23 जण बेपत्ता

आंध्रप्रदेशातील देवीपटनमजवळ येथे गोदावरी नदीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली. या बोटमध्ये चालकासह 63 प्रवाशी होते.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 05:53 PM IST

गोदावरी नदीत पर्यटकांची बोट बुडाली; 13 मृतदेह सापडले, 23 जण बेपत्ता

हैदराबाद, 15 सप्टेंबर: आंध्रप्रदेशातील देवीपटनमजवळ येथे गोदावरी नदीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली. या बोटमध्ये चालकासह 62 प्रवाशी होते. काही जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत या भीषण अपघातामध्ये 13 मृतदेह सापडले असून अद्याप 49 जण बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे. गोदावरी (पूर्व) जिल्ह्यात रविवारी दुपारी ही घटना घडली आहे.

गोदावरीचे (पूर्व) पोलिस अधिक्षक अदनान नईम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप 33 जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची दोन पथकं दाखल झाली आहेत. एका पथकात 30 सदस्य आहे. मदत कार्यात ओएनजीसी आणि नौदलाचे हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे.

Loading...

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. तर या अपघातामध्ये मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये देणार आहेत. गोदावरी नदीत संचलीत सर्व बोटींचा परवाना रद्द करण्याचेही आदेश मुख्यंत्र्यांनी दिले आहेत. मंत्री अवंती श्रीनिवास दुर्घटना स्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, रविवारी घडलेली ही सगळ्यात मोठी घटना आहे. या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बोटीमध्ये बसण्यापुर्वी आणि बसल्यानंतर मोबाईलमध्ये काही प्रवाश्यांनी फोटो काढून ते नातेवाईकांना पाठवले होते. यात फक्त 5 जण सुरक्षित बाहेर पडले. हे सगळे तेलंगणाच्या वारंगल जिल्हयाचे रहिवासी असल्याची माहिती आहे. एकुण 62 प्रवासी बोटीमध्ये होते. त्यात 8 क्रु सदस्य होते. 14 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 22 पर्यटक हैदराबाद इथून आहेत.

पेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...