मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतातील 63 श्रीमंतांकडे संपूर्ण देशाच्या एक वर्षाच्या बजेटपेक्षा जास्त संपत्ती – रिपोर्ट

भारतातील 63 श्रीमंतांकडे संपूर्ण देशाच्या एक वर्षाच्या बजेटपेक्षा जास्त संपत्ती – रिपोर्ट

जगात गरीब व श्रीमंतामधील अंतर वाढत जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे

जगात गरीब व श्रीमंतामधील अंतर वाढत जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे

जगात गरीब व श्रीमंतामधील अंतर वाढत जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे

  • Published by:  Meenal Gangurde
दावोस, 20 जानेवारी :  देशातील एक टक्का गलेलठ्ठ श्रीमंतांकडे देशातील तब्बल 95.3 कोटी लोकांपेक्षा चार पटीने जास्त संपत्ती आहे. या श्रीमंतांकडे इतकी संपत्ती आहे की, यामध्ये देशाचा एक वर्षाचा बजेट (Union Budget) होऊ शकतो. जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) वार्षिक बैठकीत एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. स्वित्झलॅंडमधील दावोस या शहरात WEF च्या 50 व्या वार्षिक बैठकीत ऑक्सफेमने ‘टाइम टू केयर’ नावाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार जगातील एकूण 2,153 अरबपतींजवळ, जगाचा एकूण  60 टक्के हिस्सा असलेल्या 4.6 अरब लोकांपेक्षाही जास्त संपत्ती आहे. या अहवालात ऑक्सफेमने नमूद केल्यानुसार भारतात 63 अरबपतींकडे देशाच्या  वार्षिक बजेटपेक्षा जास्त संपत्ती आहे. 2018-19 या वर्षात बजेटचा संदर्भ देण्यात आला आहे. या वर्षात देशाचे बजेट 24 लाख 42 हजार 200 कोटी रुपये इतके  होते. जगात गरीब व श्रीमंतामधील अंतर वाढत जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. असमानता कमी करण्यासाठी विविध नीती आणल्याशिवाय हे अंतर कमी करता येऊ शकत नाही. या वार्षिक बैठकीत लैंगिक असमानतेवरही चर्चा झाली. याव्यतिरिक्त जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याची शक्यता यावेळी जाहीर करण्यात आली. या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, श्रीमंत व गरीबांमधील अंतर वाढल्याचा परिणाम जगातील सुमारे अर्ध्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
First published:

Tags: Economics

पुढील बातम्या